महालगाव ते नाकाडोंगरी रस्त्याची दुरुस्ती करा व ओव्हरलोड वाहतुकीला आळा घाला. या मागणीसाठी ब्राह्मणटोला येथे होणार 28 जूनला रास्ता रोको आंदोलन…

0
116

जिल्हा प्रतिनिधी/ सतीश पटले

तुमसर तालुक्यातील सोंड्या व वारपिंडकेपार येथे बावनथडी नदी घाटावर रेती डेपो सुरू असून या रेती डेपोच्या नावाखाली रेती तस्करांनी बावनथडी नदीपात्रातील रेतीची अवैधरित्या उत्खनन करून मोठमोठे डम्पिंग यार्ड तयार केले. यामुळे महसूल विभागाला कोट्यावधीचा महसूल बुडत आहे. मात्र या रेती चोरीला आळा घालणार कोण? अशा प्रश्न अनुत्तरीत आहे. यातच महालगाव ते नाकाडोंगरी रस्त्यावरून ओव्हरलोड रेतीचे ट्रक रात्रंदिवस धावत असल्याने रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे तर रस्त्यावर मोठमोठे जीवघेणे खड्डे पडले. यामुळे वाहनधारकांना वाहन चालविताना कमालीचा त्रास सहन करावा लागतो तर या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकांचे अपघात झाले. याच रस्त्यावरील खड्ड्यांमुळे रस्त्याच्या कडेला ओव्हरलोड रेतीचे ट्रक पलटी झाल्याच्या अनेक घटना घडल्या. दरम्यान ओव्हरलोड ट्रकमुळे ब्राह्मणटोला येथील पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन वारंवार फुटत असल्याने गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. यापूर्वीही ब्राह्मणटोला येथील सरपंच पारस भुसारी यांनी यासंबंधी पोलीस विभाग, महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाला तक्रार व निवेदने दिली. मात्र या समस्येकडे अजूनपावेतो तोडगा काढण्यात आला नाही. यामुळे रेती तस्करीला पाठबळ कोणाचे? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. यातच महालगाव ते नाकाडोंगरी रस्त्याची दुरुस्ती करा व ओव्हरलोड वाहतुकीला आळा घाला या मागणीसाठी महालगाव व ब्राह्मणटोला येथील नागरिकांनी शासन प्रशासन विरोधात एल्गार पुकारला असून ब्राह्मणटोला येथे 28 जूनला रास्ता रोको आंदोलन होणार असल्याची माहिती सरपंच पारस भुसारी यांनी दिली आहे.

Previous articleजहाल मोर्‍हक्या नक्षली गिरीधरचे सपत्नीक आत्मसर्पण
Next articleआ.डॉ.देवरावजी होळी यांच्या उपस्थितीत कुनघाडा – तळोधी जिल्हा परिषद सर्कल बैठक संपन्न