आ.डॉ.देवरावजी होळी यांच्या उपस्थितीत कुनघाडा – तळोधी जिल्हा परिषद सर्कल बैठक संपन्न

0
61

दिनांक २४ जून कुनघाडा

विधानसभा निवडणुकांची हलचल सुरू झाली असून भारतीय जनता पार्टीचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून आपणही या निवडणुकीसाठी सज्ज राहावे असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी कोळी यांनी कुनघाडा – तळोधी जिल्हा परिषद सर्कल बैठकीच्या प्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले.

यावेळी प्रामुख्याने जिल्हा सचिव दिलीप चलाख,जिल्हा सचिव साईनाथ बुरांडे, तालुका उपाध्यक्ष जैराम चलाख, भाजपचे जेष्ठ नेते बंडुजी चिळंगे, श्रीधर मांदाडे, किशोर गटकोजवार, भाजपा युवा नेता उमेश कुकडे, जितू कुणघाडकर, यांचे सह जिल्हा परिषद क्षेत्रातील बूथ प्रमुख, बूथ पालक व शक्ती केंद्र प्रमुख परिसरातील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांनी जनतेमध्ये खोटे व निराधार भ्रम पसरवून विजय मिळवलेला आहे . परंतु आता जनतेचा भ्रम दूर होत आहे. या विधानसभा निवडणुकीत जनता आपल्या पाठीशी आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी सक्रिय राहून लोकांचे काम करावे असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.