वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- गजानन पोटदुखे
दिनांक :- 24 जून 2024
देवळी शहरात सोनेगावं रोड वर अगदी पोलीस कॉटर समोर भरदिवसा दुपारी 3:30 च्या दरम्यान सोनेगाव येथील रहिवाशी हे शेजारच्या महिलाले सोबत देवळीकडे येत होते. त्या दरम्यान करण नावाच्या युवकाने मृतक विनोद भरणे वय (45) वर्ष यांना रस्त्याने येताना अडविले आणि पैशाची मागणी केली . मृतक विनोद यांनी पैसे देण्यास विरोध केला असता आरोपी करण याने विनोद व सोबत असलेल्या महिलेस गोट्याने मारहाण केली. महिलेने घटनेचे गांभीर्य ओळखून त्या ठिकाणाहून आरडा ओरडा करत पळ काढला. मृतक विनोद खाली पडल्यावर आरोपी याने मृतकाच्या डोक्यावर पाच ते सहा वेळा गोट्याचा मारा परत त्याचे डोक्याच्या चेंदा मेंदा केले.
रस्त्यावर हे सर्व चालू असताना गर्दीतील लोकांनी बघ्याची भूमिका घेतली.
https://youtu.be/wSl_xhEL47Q?si=xUsW0e0ghzt-Ce8i
आरोपी हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून याच्या विरोधात देवळी पोलीस स्टेशन मध्ये बरेचश्या तक्रारी दाखल आहे. भर दिवसा झालेल्या घटनेमुळे सदर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.आरोपी ला घटनास्थळावरून देवळी पोलिसांनी त्वरित अटक केली आहे.
पुढील तपास देवळी करीत आहे.