डाॅ. श्रीकांत पाटील लिखित “कडेलूट” कादंबरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट कादंबरी लेखन पुरस्काराने सन्मानित

0
12
1
कोल्हापूर – संत गाडगेबाबा विचारमंच ओतूर व ज्ञानज्योत फाउंडेशन मांजरी जिल्हा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे सभागृहात पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रसिद्ध कथाकार व कवी मा. बबन पोतदार यांच्या हस्ते संस्कृती प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या डाॅ. श्रीकांत पाटील यांच्या “कडेलूट” या कादंबरीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट कादंबरी लेखन पुरस्कार प्राप्त झाला. यावेळी व्यासपीठावर यशदाचे संशोधन अधिकारी डॉ. बबन जोगदंड सर, अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे, सुप्रसिद्ध समीक्षक लेखक डॉ. मिलिंद कसबे, आधुनिक बहिणाबाई म्हणून प्रसिद्ध असलेल्या कवयित्री मा. विमल माळी, संयोजक मा. रणजीत पवार, कवयित्री मा. कविता काळे, मा. कांचन मून मा. राजेश साबळे, निवेदक गझलकार मा. दिनेश भोसले व इतर मान्यवर उपस्थित होते.