*अहेरी*:- येथील पॉवर हाऊस कॉलनीत 33 के. व्ही. रोहित्र उपकेंद्राचे भूमिपूजन शनिवार 22 जून रोजी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना.धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी मंचावर मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम, महाराष्ट्र राज्य वितरण विभागाचे कार्यकारी अभियंता सुधीर हेडाऊ, तहसीलदार बालाजी सोमवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे, अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धराव बाबा आत्राम, माजी सरपंच गंगाराम कोडापे, नगर सेवक अमोल मुक्कावार आदी मान्यवर उपस्थित होते.
मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी कुदाळी मारून व फलकाचे फित कापून विधिवत व रीतसर 33 के. व्ही. वीज उपकेंद्राचे भूमिपूजन केले.
या प्रसंगी उदघाटनीय स्थानावरून बोलताना ना.धर्मराव बाबा आत्राम म्हणाले की, अहेरी आणि परिसरातील विजेची समस्या लक्षात घेता मागील अनेक वर्षापासून अहेरी येथे 33 के. व्ही. विजेचे उपकेंद्र व्हावे ही नागरिकांची मागणी होती. विजेची समस्या दूर व्हावे यासाठी आटोकाट प्रयत्न होते, त्यासाठी अहेरी व तालुक्यातील पेरमिली येथे 33 के. व्ही. वीज उपकेंद्र उभारणीसाठी भरीव निधी मंजूर करून भूमिपूजन करण्यात आले असून आता अहेरी आणि पेरमिली भागातील असंख्य गावांना सुरळीत वीज मिळणार असून वीजेची समस्या कायमस्वरूपी मिटणार असल्याचे मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम म्हणत माझे मिशनच शिक्षण, सिंचन, आरोग्य, वीज, रस्ते असल्याचे आवर्जुन उल्लेख केले.
प्रास्ताविकातून वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता सुधीर हेडाऊ यांनी, विजेची समस्या लक्षात घेता मंत्री ना.धर्मराव बाबा आत्राम यांच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करून निधी मंजूर व उपलब्ध करण्यात आले असून आता आपल्या भागात विजेची समस्या व प्रश्न मिटणार असल्याचे आवर्जुन सांगितले.
सूत्रसंचालन व आभार सुरेंद्र अलोणे यांनी केले.यावेळी वीज वितरण कंपनीचे कर्मचारी , प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, राजकीय व सामाजिक कार्यकर्ते आणि गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते.