..वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- गजानन पोटदुखे
देवळी शहरात सोनेगावं रोड वर अगदी पोलीस वसाहत समोर भरदिवसा दुपारी 3:30 च्या दरम्यान सोनेगाव येथील रहिवाशी मृतक विनोद भरणे गोट्याने ठेचून ठेचून यांची हत्या करण्यात आली.एक महिला सुद्धा गंभीर स्वरूपाची जखमी झाली.एकंदरीत हा सर्व थरार काही काळ पोलीस वसाहतीसमोरच सुरू होता. परंतु कोणत्याही पोलीस कर्मचारी या घटनेसाठी जबाबदारीने धावून आलेला नाही. आरोपी हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. त्याच्या विरोधात या अगोदर सुद्धा देवळी पोलीस स्टेशनला गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत.देवळी शहरात सुरू असलेले अवैध व्यवसाय,दारू व्यवसाय,सट्टा पट्टी, त्वरित बंद करण्यात यावे, देवळी शहरात अवैधरित्या राहणाऱ्या पुलगाव रोडवरील सर्व झोपडीधारकाची तपासणी करण्यात यावी, त्यांना या ठिकाणावरून हटविण्यात यावे. देवळी शहरातील व ग्रामीण भागातील येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सुरक्षितता द्यावी या मागणी साठी माजी खासदार रामदास तडस यांच्या नेतृत्वात विविध संघटना विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, व्यापारी संघटना, ग्रामीण भागातील नागरिक व देवळी शहरातील सर्व नागरिक महिला यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय निवेदन देवळी चे ठाणेदार यांचे मार्फत उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.राहुल चव्हाण यांना देण्यात आले. आणि आरोपी विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे, आणि कठोर शिक्षा करण्यात यावी यांची मागणी केली.यावेळी शेकडो नागरिक देवळी पोलीस स्टेशनं समोर जमा झालेले होते. काही काळ तणावाचे वातावरण सुद्धा निर्माण झाले होते. यावेळेस अतिरिक्त पोलीस कुमक सुद्धा बोलवण्यात आले होते. या घटनेचा पुढील तपास देवळीचे ठाणेदार करीत आहे.

