सालेकसा
स्वच्छ माझा दवाखाना या उपक्रमांतर्गत ग्रामीण रुग्णालय सालेकसा येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ.बी डी जैयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ्ता उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमाला चांगलाच प्रतिसाद मिळाला असून गावातील समाजसेवी, नागरिकांनी ग्रामीण रुग्णालय परिसरात स्वच्छता करून स्वच्छ माझा दवाखाना या उपक्रमाला यशस्वी केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.आर आर त्रिपाठी , एस एल होलकर ,जयकुमार रगडे ,रजत जानेवार,महेश नेवारे ,प्रशांत पाटिल,सुनील असाटी , स्वच्छता ऍम्बेसिडर ब्रजभुषन बैस , बाजीराव तरोने , विजय फुंडे , शैलेश बहेकार ,अमोल सहारे , राहुल हरडे ,भिवराम भास्कर ,राहुल देउडकर,भूमेश्वर काठेवर यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमाला यशस्वी केल्याबद्दल ग्रामीण रुग्णालय सालेकसा चे वैद्यकीय अधिकारी डॉ. आर आर त्रिपाठी यांनी सर्वांचे आभार मानले.