सालेकसा
दीर्घ प्रतीक्षेनंतर आमगाव ते दरेकसा मुख्य मार्गाला नविन करण्याचे काम सूरू झाले. सूरू झालेल्या रस्त्याच्या ठिकाणी दुरुस्तीसाठी बजरी आणि गिट्टी टाकण्यात आलेली आहे .परंतु दोन महिने काम करून देखील फक्त 2 कि.मी. पर्यंतच्या रस्त्याचा पहिला थर टाकला आहे.उर्वरित कामाला विराम देण्यात आलेला आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असून रस्त्याची अवस्था दैनिय आणि अपघाताला आमंत्रण देणारी आहे. त्यात आणखी गिट्टी व बजरीचे रोडालगत ढिगारे पडून असल्याने नागरिकांना येण्या- जाण्याचा त्रास वाढला आहे.अपघाताच्या प्रमाणात देखील वाढ झालेली आहे. सदर रस्त्याच्या मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला आहे. करिता तातडीने या रस्त्याचे बांधकाम पूर्ण करण्यात यावे व त्याच प्रमाणे जागोजागी खड्डे पडले आहे ते खड्डे तातडीने भरण्यात यावे .असे निवेदन पंचायत समिती सदस्य अर्चना अंबरलाल मडावी यांनी उपविभागीय शाखा अभियंता बांधकाम विभाग सालेकसा यांना दिले.

