सिरोंचा तालुक्यातील नागरिकांसाठी सरकारी,निमसरकारी दप्तरी कामकाजासह बँकिंग सेवा पूर्वीप्रमाणे ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्याची मागणी.

0
10
1

सिरोंचा – सरकारी ,निमसरकारी व बँकिंग कामकाजासह अन्य कामे हे ऑफलाइन पद्धतीने होत असतांना तालुक्यातील नागरिकांची ,शालेय विध्यार्थ्यांचे व विविध योजनांचे लाभार्थ्यांची कामे जलदगतीने वेळेवर होत होता.परंतु सिरोंचा तालुक्यात ‘डिजिटल इंडिया’ चा नावाने सर्वदूर मोबाईल इंटरनेट नेटवर्क सेवा नियमित व सुरळीत न करताच अचानकपणे सरकारी,निमसरकारी व बँकिंग सेवेसह अन्य सर्व कामे हे ऑनलाईन पध्दतीने केल्याने याची फटका मागील अनेक वर्षांपासून सिरोंचा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी व विविध योजनांचे लाभार्थ्यांसह शालेय विध्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे.

 

सिरोंचा येथील बी.एस.एन.एल.ची इंटरनेट मोबाईल सेवा हे सुरुवाती पासून तर आजपर्यंत ऑक्सिजनवरच आहे.इथे एकही खाजगी मोबाईल टॉवर उपलब्ध नसल्याने येथील ओनलाईन सेवा फक्त बी.एस.एन.एल.इंटरनेट सेवेवर आधारित आहे.मात्र ही इंटरनेट सेवा नेहमी बंद पडत असल्याने येथील नागरिकांना ,शेतकऱ्यांना व शालेय विध्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने आपापली कामे करून घेतांना मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावं लागत आहे.सदरहू समस्या सुधारण्याकडे दिवसेंदिवस सरकार व संबंधित विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होतांना दिसून येत आहे.

 

यंदा शेतीचे हंगामासह शालेय विध्यार्थ्यांचे प्रवेशाचे सत्र सुरू झाल्याने शेतकरी वर्गांसह शालेय विद्यार्थी विविध दाखल्यांसाठी व गरजूवंत कामांसाठी तहसील कार्यालय, सेतू केंद्रासह विविध बँकाकडे गर्दी होतांना दिसून येत आहे.मात्र इंटरनेट सेवेअभावी सगळ्यांचीच कामे प्रभावित होत आहे.सिरोंचा तालुक्यासाठी इंटरनेटची समस्या आता कायमचीच होऊन गेल्याने अन नेहमी ही समस्या उद्भवत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सिरोंचा तालुक्यातील नागरिकांसाठी आपले स्वतःचा अधिकाराचा उपयोग करून एक स्वतंत्र अध्यादेश काढून पूर्वीप्रमाणेच नागरिकांची सर्व कामे ऑफलाईन पध्दतीने होण्यासाठी सर्व सेतुकेंद्रासह संबंधित सर्व विभाग प्रमुखांना तात्काळ आदेशीत करण्यात यावी,अशी मागणी सिरोंचाचे माजी उपसरपंच व सामाजिक कार्यकर्ते रवी सल्लम यांनी केली आहे.

 

मागील वर्षीपासून सिरोंचा ते आल्लापल्ली या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकामाला सुरुवात झाली आहे.आजच्या घडीला या महामार्गाचे काम कासवगतीने सुरू आहे.विशेष म्हणजे आल्लापल्ली वरून सिरोंचासाठी याच मार्गावरून बी.एस.एन.एल.ची अंडरग्राऊंड केबल टाकण्यात आली.राष्ट्रीय महामार्गाचे कामावर जेसीबी सह इतर वाहनांने रस्त्याची खोदकाम करतांना नेहमी केबल तुटून तब्बल तीन-तीन दिवस येथील मोबाईल इंटरनेट सेवा बंद पडत आहे.परिणामी येथील सर्व कामे इंटरनेट अभावी रखडत आहे.या राष्ट्रीय महामार्गाचे कामाची प्रगतीवरून सदरहू काम पूर्ण व्हायला आणखी तीन ते चार वर्ष लागण्याची शक्यता आहे. सिरोंचाची मोबाईल इंटरनेट सेवा वारंवार अघोषित बंद पडत असल्याने येथील सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी ,विविध योजनांचे लाभार्थ्यांसह शालेय विध्यार्थ्यांचे कामे रखडत आहेत. सिरोंचा तालुक्यातील नागरिकांची सर्वच कामे ऑनलाईन ऐवजी आता पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पध्दतीने होणे गरजेचं वाटतं आहे.

 

सिरोंचा तालुक्यातील नागरिकांना नियमित व सुरळीत मोबाईलची इंटरनेट सुविधा मिळावे म्हणून तेलांगणावरून सिरोंचासाठी बी.एस.एन.एल.सेवा संलग्न करण्याचे कामाचे प्रस्ताव प्रस्तावित आहे.मात्र सदर प्रस्ताव हे आजतागायत संबंधित विभागाच्या वरिष्ठ पातळीवर धूळखात पडून असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.म्हणून सिरोंचाकरांची या आशेवरही पाणी पेरण्याची दाट शक्यता असल्याने आता इंटरनेट सेवेची इथे कोणत्याही प्रकारची गॅरंटी नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी या समस्या विषयी स्वतः पुढाकार घेऊन सिरोंचा तालुक्यातील नागरिकांसाठी पूर्वीप्रमाणे सरकारी,निमसरकारी व बँकिंग सेवेसह सेतुकेंद्रामधील कामेही ऑफलाईन पध्दतीने होण्यासाठी तात्काळ स्वतंत्र आदेश काढण्याची मागणी सिरोंचाचे माजी उपसरपंच व सामाजिक कार्यकर्ते रवी सल्लम यांनी केली आहे.