मी विधानसभा निवडणूक लढणारच.. धनेंद्र तुरकर यांची माहिती

0
115
1

जिल्हा प्रतिनिधी/सतीश पटले

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे. अशात कोणत्या मतदारसंघातून कोण निवडणूक लढणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळासोबतच सर्वसामान्य लोकांमध्ये देखील आहे. अशातच राष्ट्रवादी(अजित पवार गट ) पक्षाचे तालुका अध्यक्ष था माजी शिक्षण व अर्थ सभापती धनेंद्र तूरकर यांनी तुमसर – मोहाडी विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्धार बोलून दाखवला असून त्यांनी प्रचाराला सुद्धा सुरवात केली आहे.

विधानसभा निवडणूक २०२४ चा रणसंग्राम सुरु झाला आहे. अशात महाराष्ट्रात आघाडी आणि युतीच्या चर्चा सुरु आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीचं जागावाटप अद्याप जाहीर झालेलं नाही. अशात आता अनेक पक्षातील नेत्यांनी ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतल्याचं दिसतं आहे. अनेकांनी तुमसर -मोहाडी विधानसभा निवडणूक लढण्याचा मानसही त्यांनी बोलून दाखवला आहे. विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की मी निवडणूक लढवावी. मतदार संघात प्रचार सुरू केला आहे, धनेंद्र तूरकर यांनी म्हटलं आहे.

निवडणूक लढणारच- धनेंद्र तूरकर 

लोकांच्या आग्रहाखातिर ही निवडणूक लढणार आहे. शेतकरी यांना ऑन द स्पॉट निर्णय या पद्धतीने निवडणूक लढणार आहे. जनतेचा विजय निश्चित होईल आणि ऐतिहासिक निकाल लागेल धनेंद्र तूरकर म्हणाले. माझ्या निवडणूक लढण्याच्या निर्णयाने प्रस्थापितांच्या पाया खालची वाळू सरकली आहे. रस्त्यावरची लढाई सभागृहात न्यायाची अशी भावना शेतकऱ्यांची आहे. धाना चा आवाज महाराष्ट्राच्या सभागृहात घुमला पाहिजे. पक्षश्रेष्ठी कडे तिकीट मागणार आहे. पक्षाने माझ्यावर विश्वास ठेऊन उमेदवारी दिली तर त्याचं सार्थक करण्याचा प्रयत्न करणार आहे. 

“शेतकरी हाच माझा पक्ष”

जनशक्ती विरुध्द धनशक्ती अशी निवडणूक होणार आहे. खासदार प्रफुल पटेल यांच्याशी तिकीट संदर्भात बोलणे झाले. , त्यांनी पक्षवाढीसाठी प्रचाराला वेग दया असे बोलले. उमेदवारी सर्वाना विश्वासात घेऊन दिली जाईल यांची ग्वाही दिली. पण आता गाव गाड्यातील शेतकरीच माझा पक्ष आहे. सामान्य माणूस म्हणजे आपला पक्ष आहे. त्यांच्याच आशिर्वादाने मी निवडून येणार, असं विश्वास धनेंद्र तूरकर यांनी व्यक्त केला.