माजी खासदार शिशुपाल पटले यांच्या जनसंपर्क अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
21
1

 

जिल्हा प्रतिनिधी/ सतीश पटले 

तुमसर :- तालुक्यातील येरली जिल्हा परिषद क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या समस्या जानून घेण्यासाठी माजी खासदार शिशुपाल पटले यांनी जनसंपर्क दौरा केला. त्या दौराला संम्पूर्ण क्षेत्रातिल लोकानि उत्स्फूर्त प्रतिसाद देत तालुक्यातील झारली गावात सिंचनाची सोय उपलब्ध नसल्याचे या गावात विशेष लक्ष देण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली, ओ.बी.सी.ना मिळालेल्या घरकुलाचे पैसे अजूनही मिळाले नसल्याची तक्रार लाभार्थ्यांनी सांगितले.यासह जलसंपदा, महावितरण, महसूल, वनविभागाच्या इतर विषयावर समस्या माजी खासदार शिशुपाल पटले यांना सांगीतल्या त्यावर लवकरात लवकर समस्या सोडाविन्याचे प्रयत्न करू असी माहिती माजी खासदार शिशुपाल पटले यानी दिली.या जनसंपर्क अभियानात शेकडो कार्यकर्ते,शेतकरी व नागरिकांनी गर्दी केली होती.या जनसंपर्क दौऱ्यात प्रामुख्याने तालुका अध्यक्ष काशीराम टेंभरे,जिल्हा परिषद सदस्य बंडूू भाऊ बनकर, डोमा भगत, डॉ. रमेश पारधी, अनुप पारधी, यादोरावजी पारधी, संजय कटरे,ललित तुरकर, हाऊसिलाल पारधी, विनोद बिसने, बंटी पटले,ईश्वर पटले,नामदेव पारधी,मेहगाव चे सरपंच शैलेश फंदी,संजय पटले उपस्थित होते.