सुरजागड ईस्पात कंपनी तर्फे नोट बुक व साडी वाटप,मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते वितरण ,शालेय बाल विद्यार्थी व महिलां मध्ये उत्साह. 

0
69

*अहेरी:*- नजीकच्या वडलापेठ येथे शनिवार 22 जून रोजी सूरजागड ईस्पात कंपनी व मियाम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांना नोट बुक, पुस्तके व स्कूल बॅग आणि महिला भगिनींना साडीचे वाटप करण्यात आले.

नोट बुक व साडी वितरण कार्यक्रमात उदघाटन स्थानी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम होते तर मंचावर प्रमुख अतिथी म्हणून अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धराव बाबा आत्राम, पोलीस पाटील निरंजन दुर्गे, आदिवासी सेवक डॉ.चरणजित सिंग सलुजा, प्रमोद इश्टाम, आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी उदघाटनीय स्थानावरून मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम म्हणाले की, शिक्षण हे सर्वांगीण विकासाचे मुख्य स्त्रोत असून आजचे विद्यार्थी भविष्यातील देशाचे आधारस्तंभ असून विद्यार्थी उतमोत्तम व दर्जेदार शिक्षण घेऊन स्वतःचे, कुटुंबाचे, गावाचे पर्यायाने राज्याचे उज्ज्वल भविष्य घडवावे आणि नाव लोकीक करावे असे म्हणत मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

तदनंतर मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम व अन्य मान्यवरांच्या शुभहस्ते शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींना नोटबुक, पुस्तके, स्कूल बॅग आणि महिला भगिनींना साडी वितरीत करण्यात आले. त्यामुळे शालेय विद्यार्थी व महिला भगिनींमध्ये उत्साह संचारले होते.

प्रास्ताविक पोलीस पाटील निरंजन दुर्गे यांनी तर सूत्रसंचालन सुरेंद्र अलोणे यांनी केले.

यावेळी बहुसंख्येने शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला भगिनी, वडलापेठ व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleमाजी खासदार शिशुपाल पटले यांच्या जनसंपर्क अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
Next articleवैद्यकीय अधिकारी पदभरती  : 5 जुलैला मुलाखती