गोंदिया, दि.27 : जिल्ह्यातील आदिवासी व दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी (गट-ब) या रिक्त असलेल्या पदांवर 11 महिन्यांचे कालावधीकरीता BAMS अर्हताधारक उमेदवारांची समुपदेशनाव्दारे कंत्राटी/तदर्थ स्वरूपात नियुक्ती करावयाची आहे. तरी BAMS अर्हताधारक उमेदवारांनी आवश्यक दस्तऐवजांसह शुक्रवार 5 जुलै 2024 रोजी वसंतराव नाईक सभागृह, प्रशासकीय इमारत, जिल्हा परिषद गोंदिया येथे सकाळी 10 वाजता थेट मुलाखतीकरीता उपस्थित रहावे. सविस्तर माहिती gondia.gov.in तसेच zpgondia.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. असे सदस्य सचिव, जिल्हा निवड समिती तथा जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद गोंदिया यांनी कळविले आहे.