आमगाव येथे सामाजिक न्यायदिवस साजरा

0
15
1

आमगाव : मागासवर्गीय, शोषित,पिडीत समाजाला आरक्षण बहाल करणारे महामानव राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती ” सामाजिक न्यायदिवस” रूपात भारतीय बौद्ध महासभा व सामाजिक एकता मंच आमगाव च्या वतीने डा. बाबासाहेब आंबेडकर सभागृह,राजयोग कालनी, आमगाव येथे साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष वाय.सी.भोयर होते.प्रमुख वक्ते सावन कटरे,भरत वाघमारे, प्रमुख अतिथी उल्हास तागडे, लोकेश लांडगे,शुभांगी टेंभूर्णे, देशभ्रतार शहारे, कल्याणी बोरकर लाभले.कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन योगेश रामटेके यांनी केले.