पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या त्या नेत्यावर कारवाई करा: व्हॉइस ऑफ मीडिया अहेरी तर्फे निवेदन सादर.

0
115

अहेरी:मूल येथील दैनिक पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी तथा व्हॉईस ऑफ मिडीया चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष संजय रघुनाथ पडोळे यांना वृत्तपत्रात बातमी प्रकाशित केल्याचे कारणावरून काँग्रेस नेते प्रकाश मुरलीधर मारकवार यांनी भ्रमणध्वनीव्दारे त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे.

 

याप्रकरणी संजय पडोळे यांनी पोलीसांत तक्रार दिली असून कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

 

पत्रकाराला जिवे मारण्याची धमकी दिल्याने प्रकाश मारकवार यांचेवर कठोर कारवाईची मागणी करीत व्हाईस ऑफ मिडीया अहेरी तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने घटनेचा निषेध नोंदवित अहेरीचे तहसीलदार मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले आहे.

 

काँग्रेस नेते प्रकाश मारकवार यांनी संजय पडोळे यांना दिलेली धमकी ही वृत्तपत्र स्वातंत्र्याची पायमल्ली करणारी असुन पत्रकार आणि वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य हिरावुन घेणारी असल्याचे दिसुन येते. त्यामुळे सदर नेत्याकडुन झालेल्या बेकायदेशीर कृत्याचे आम्ही व्हॉईस ऑफ मिडीया अहेरी तालुक्यातील सर्व पत्रकार जाहीर निषेध नोंदविला आहे. सोबतच काँग्रेस नेते प्रकाश मारकवार यांनी संजय पडोळे यांना जिवे मारण्याच्या दिलेल्या धमकीमुळे त्यांचेवर फौजदारी गुन्हयाची नोंद करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी. अशी मागणी व्हॉईस ऑफ मीडिया तालुका अहेरी निवेदनातून केलेली आहे.

यावेळी निवेदन सादर करतांना मिलिंद खोंड,अशोक पागे ,पंकज नौनुरवार,आनंद दहागावकर,आशिष सूनतकर आदी.सह पदाधिकारी व सदस्य पत्रकारांची उपस्थिती होती.

Previous articleरुग्णवाहिका न मिळाल्याने ४ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू अहेरी तालुक्यातील पेरमिलीची घटना…
Next articleअन्यायकारक शासननिर्णय विरोधात मराशिप ने केले आंदोलन.