अन्यायकारक शासननिर्णय विरोधात मराशिप ने केले आंदोलन.

0
468
1

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे आज दिनांक 28 जून 2024 ला संविधान चौक नागपूर येथे धरणे आंदोलन आयोजित केलेले आहे या आंदोलनात नागपूर विभागातील मोठ्या संख्येने शिक्षक बंधू आणि भगिनी उपस्थित होते.

हे आंदोलन दिनांक 15 मार्च 2024 च्या संच मान्यता सुधारित शासन निर्णय रद्द करा यासाठी आयोजित करण्यात आले होते हा शासन निर्णय प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या सुधारित संचमान्यतेत विद्यार्थी पटसंख्या मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक व शिक्षक पदाची मंजुरी संख्या याबाबतच्या विविध निकषात विविध प्रतिकूल सुधारणा केलेल्या आहेत ज्यामुळे शासनाचा आरटीई कायद्यातील तरतुदीचे पूर्णपणे उल्लंघन झाल्याचे दिसून येते हे शैक्षणिक दृष्ट्या प्रगत प्रयोगशील व पुरोगामी महाराष्ट्रासाठी भविष्यात नक्कीच धोक्याची घंटा ठरणारी आहे यामुळे राज्यातील हजारो शाळांमधील हजारो शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा तसेच शेकडो शाळा मुख्याध्यापक विरहित राहण्याचा, विषय शिक्षकांची अपेक्षित संख्या रोडवण्याचा, एकापेक्षा अधिक वर्ग एकत्रित प्रोत्साहन देण्याचा व कार्यरत शिक्षकांच्या अतिरिक्त ताण तणाव व अतिरिक्त कार्यभार वाढण्याचा धोका संभवतो. या निकष बदलामुळे शाळेचा दर्जा व विद्यार्थ्यांची गुणवत्ता घसरेल मोठ्या प्रमाणावर शिक्षक अतिरिक्त ठरतील व महाराष्ट्र शिक्षणाच्या बाबतीत भविष्यात पीछेहाट होईल हे योग्य नाही. त्यामुळे संघटनेने हा शासन निर्णय दिनांक 15 मार्च 2024 चा शासन निर्णय रद्द करावा यासाठी धरणे आंदोलन घेण्यात आले हे आंदोलन नागपूर विभाग अध्यक्ष अजय वानखेडे व नागपूर विभाग कार्यवाह सुभाष गोतमारे यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आले. याप्रसंगी नागपूर विभाग शिक्षक माजी आमदार नागो गाणार उपस्थित होते तसेच राज्य महिला आघाडी प्रमुख पूजाताई चौधरी, विभाग कोषाध्यक्ष संतोष सुरावार, प्राथमिक विभाग अध्यक्षा रंजना कावळे, हेमंत बेलखोडे, कार्याध्यक्ष सुनील चीजघरे, कोषाध्यक्ष राहुल शेंद्रे, महिला आघाडी प्रमुख सरिता सोनकुसरे, उपाध्यक्ष मधुकर मुपीडवार, संघटनमंत्री रामदास गिरटकर, कार्यालयमंत्री सुधीर वारकर, महिला आघाडी प्रमुख मनीषा वाकोडे, सहकार्यवाह पुंडलिक नाकाडे, घनश्याम पटले, मनीषा साळवे, ललिता हलमारे, रत्ना चौधरी, मृणाल तुंपलीवार, राजाराम खामकर, प्रदीप मेश्राम, गुणेश्वर पुंडे, अशोक वैद्य, सुधीर पाटील, राजेंद्र पटले, प्रमोद बोडे, सय्यद सलीम, रुपेंद्र बसेशंकर, डिंपी बजाज, सतीश कचरे, अतुल टेकाडे, गुणवंत उचितकर, वसंत हिवसे, ज्योती बोकडे, सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते या धरणे आंदोलनात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या आंदोलनाचे निवेदन माननीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना देण्यात आले. या सुधारित संचमान्यतेमुळे 20 पेक्षा कमी विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळेत एकच शिक्षक उपलब्ध होईल. 20 ते 60 व त्यापुढील 61 विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळेत केवळ दोन शिक्षक उपलब्ध होतील. विद्यार्थी पटसंख्या 135 पेक्षा कमी झाल्यास शाळेतील मुख्याध्यापक पत्र रद्द होईल व ते मुख्याध्यापक जवळच्या शाळेत पदावनतिने शिक्षक पदी समायोजन केल्यास त्यांना सेवा व वेतन संरक्षण मिळणार नाही. प्राथमिक शाळेत विद्यार्थी पट 60 पर्यंत असल्यास केवळ एक शिक्षक उपलब्ध होईल व दुसरे पद सेवानिवृत्त शिक्षकांमधून भरले जाईल जे बेकायदेशीर असेल आणि बेरोजगारीस चालना देणारे ठरेल येत्या नववी व दहावीची वर्ग पटसंख्या 40 पेक्षा कमी झाल्यास केवळ एकच शिक्षक मंजूर होईल त्यामुळे विविध विषयांसाठी विशेष शिक्षकच मिळणार नाहीत. 500 विद्यार्थी पटसंखेच्या अटीमुळे विद्यार्थ्यांमधील कला, क्रीडा, संगीत, नाट्य, गायन, वादन गुणांना व कौशल्यांना वाव देण्यासाठी बऱ्याच शाळांना विशेष कला क्रीडा संगीत, संगणकीय ज्ञान असणारी तज्ञ शिक्षकच मिळणार नाहीत. विद्यार्थी पटसंख्येनुसार शिक्षक संख्या आणि शिक्षक संख्येनुसार वर्गखोली संख्या निकषामुळे दुबार सत्रातील हजारो शाळांमध्ये शिक्षकांची वाढीव पायाभूत पदेच कायमची रद्द होतील. हे सर्व आरटीई कायद्यातील तरतुदींचा भंग करण्याचा करणाऱ्या आणि विद्यार्थी शिक्षक शिक्षण व शाळा विकासासाठी व गुणवत्ता विकासासाठी जाचक व मारक ठरणार त्यामुळे हा दिनांक 15 मे 2024तास शासन निर्णय तात्काळ रद्द करावा असे शासनाला या आंदोलनाच्या स्वरूपाने सांगण्यात आले आहे. हा शासन निर्णय रद्द न केल्यास संघटना पुन्हा तीव्र व आक्रमक आंदोलन करेल असे कळविले आहे.