अहेरी… अहेरी पंचायत समिती अंतर्गत ग्रामीण भागात ग्रामपंचायत घरटॅक्स पावतीवरसुद्धा घरकुल योजनेचा लाभ देण्यात येतो मात्र अहेरी नगरपंचायत हद्दीतील वर्षानुवर्षांपासून अतिक्रमीत जागेवर निवास असतानाही घरकुल योजनेचा लाभ नाकारण्यात येत आहे. परिणामी शहरी भागातील नागरिकांच्या घरांचे स्वप्न स्वप्नच राहत आहे. त्यामुळे अहेरी नगरपंचायत हद्दीतील अतिक्रमणधारकांनाही घरकुल योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
नगरपरिषद क्षेत्रातील अनेक कुटुंबे वर्षानुवर्षांपासून निवासी प्रयोजनासाठी वनविभागाच्या जागेवर किंवा महसूल विभागाच्या जागेवर अतिक्रमण करीत भोग घेत आहेत. या जागेचा नगरपंचायत कार्यालयाला नियमित करसुद्धा ते अदा करीत आहेत. मात्र भूखंडाच्या मालकी हक्काचा सबळ पुरावा नाही म्हणून पात्र असतानाही घरकुल योजनांचा लाभ नाकारण्यात येत असल्याने या वर्गात मोठा असंतोष निर्माण होत आहे.नगरपंचायत हद्दीतील क्षेत्राचे भूमी अभिलेखा कार्यालयामार्फत सर्वे करून अतिक्रमण धारकांना मालकी हक्काचे पट्टे देण्याची कार्यवाही करण्यात यावी या यामुळे शहरी भागातील अतिक्रमण धारकांना याचा लाभ घेता येईल .
तालुक्यातील ग्रामीण भागातील अनुसूचित जातीच्या कुटुंबांचे राहणीमान उंचावण्यासाठी शासनाच्या माध्यमातून कित्येक योजना राबविल्या जातात . मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुडे मागील 8 वर्षात तालुक्यातील ३९ ९६१ लाभार्थ्यांची उद्दिष्ट पूर्ती असताना फक्त ३८७ घरकुलच पूर्ण झाल्याने अहवालात दिसते अनुसूचित जातीच्या कुटुंबांचा निवाऱ्याचा प्रश्न 8 वर्षापासून ६० टक्के घरकुल अपूर्ण आहेत ग्रामीण लाभार्थ्याला एक लक्ष 32 हजार तर नक्षलग्रस्त, डोंगराळ भागात एक लक्ष ४२ हजार रुपये खर्चाची कमाल मर्यादा आहे . कालावधीनुसार योजनेच्या खर्चाची मर्यादा शासनाने वाढविणे आवश्यक आहे. तेव्हाच समन्वयाने शासनाच्या योजना प्रत्येक कुटुंबापर्यंत जाऊन राहणीमान उंचावण्यास मदत होईल. पंचायत समिती अंतर्गत सत्र 2016 ते 2024 घरकुल आवास योजनेअंतर्गत घरकुल वितरण संदर्भात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे दिसते यामुळे गरजु कुटुंब निवाऱ्या पासून आताही वंचित आहेत.अन्न ,वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करणे हे शासनाचे मुख्य धेय्य असतांनाही गरजू कुटुंबावर अन्याय होताना अहेरी तालुका काँग्रेस पक्ष सहन करणार नाही करिता प्रशासनातर्फे उच्चस्तरीय समिती गठीत करून या प्रकरणाची चौकशीचे आदेश देण्यात यावे तसेच या घरकुल योजने अंतर्गत दोषी भ्रष्ट अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हा नोंदविण्यात यावा. अन्यथा अहेरी तालुका काँग्रेस कमिटी तर्फे तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल
असे डॉ अ.निसार हकीम अध्यक्ष अहेरी तालुका काँग्रेस कमिटी यांच्या नेतृत्वात अहेरी येथील उपविभागीय अधिकारी श्री आदित्यं जीवने यांच्या दालनात भेट घेत त्यांच्यापुढे या तालुक्यासंबंधि अडचणी मांडल्या.निवेदन देताना जेष्ठ नेते अरुण भाऊ बेझलवार ,रझ्झाक कुरेशी,प्रशांत आईंचवार तसेच पदाधिकारी गणेश उपलपवर , राघोबा गौरकार ,नितीन पटवर्धन ,मधुकर सडमेक ,सुरेश दुर्गे, सत्यनारायण डोंगरे ,नितीन बंडमवार ,संतोष रामगिरीवार ,श्रीनिवास गंदम,हनीफ शेख ,लाला चन्नमवार ,सुमित झाडे ,विशाल गजडीवर ,कैलास चौधरी आदी उपस्थित होते.