
आमगाव : येथील भवभुती शिक्षण संस्था द्वारा संचालित, श्री लक्ष्मणराव मानकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आमगाव येथील डी. फार्म च्या विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन तर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या निकालामध्ये सुयश प्राप्त केले.
सदर निकालामध्ये महाविद्यालयातून प्रथम क्रमांक धनंजय शिवणकर (८४%) द्वितीय क्रमांक चारू पटले (८३%) व तृतीय क्रमांक उन्नती अग्रवाल (८०%) यांनी पटकावले.
सदर यशाबद्दल विद्यार्थ्यांनी भवभुती शिक्षण संस्थेचे संचालक श्री केशवभाऊ मानकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. के. संघी, उपप्राचार्य डॉ. तुलसीदास निंबेकर व सर्व प्राध्यापक गण यांचे आभार मानले.

