आमगाव : मा. सहायक धर्मादाय आयुक्त, गोंदिया यांच्या आदेशानुसार श्री समर्थ शिक्षण संस्था आमगाव (नोंदणी क्र. फ-१०५९ (भं) या संस्थेचे अध्यक्ष स्व. चंद्रशेखर आकांत यांच्या निधनानंतर सन २०१२ पासून मा. सहाय्यक धर्मदाय आयुक्त गोंदिया यांच्याकडे विवाद सुरू होता. त्यात मा.साहेब धर्मदाय आयुक्त गोंदिया यांनी दि १७.५.२०२४ ला नऊ बदल अर्ज रद्द करून नव्याने निवडणूक घेण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मा.निरीक्षक, मा.सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालय गोंदिया यांची नेमणूक केली.
त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक कार्यक्रम घोषित केला. संस्थेच्या कार्यकारिणीच्या सन २०२४-२०२९ साठी दि. २०/०६/२०२४ ला कार्यकारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या अर्जाच्या छाननी अंती जेवढी पदे आहेत, तेवढीच अर्ज प्राप्त झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अंतिम उमेदवारी यादी प्रसिद्ध केली व दि. २५/०६/२०२४ ला निर्विरोध निवडणुक संपन्न झाली.
संस्थेचे अध्यक्ष प्रकाश उमाळकर,
उपाध्यक्ष महान त्यागी महाराज, सचिव सुनिल आकांत,कोषाध्यक्ष सुनीता आकांत व तीन सदस्य, सतीश आकांत, सुहास आकांत, राजमन परतेति यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.
श्री समर्थ रामदास शिक्षण संस्थेची निवडणूक बिनविरोध
1