आमदार रहांगडाले यांच्यातर्फे विद्यार्थ्याना स्कूल बॅगचे वाटप

0
546
1

तिरोडा/पोमेश राहंगडाले

विधानसभा क्षेत्रात सिंचनविषयक सुविधांबरोबरच शैक्षणिक क्षेत्रात विकासाचे पाऊल टाकत तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या तर्फे जिल्हा परिषद तसेच नगर परिषद क्षेत्रातील इयत्ता १ ली व २ री च्या विद्यार्थ्याना शाळेच्या पहिल्या दिवशी स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले.

यामध्ये विधानसभा क्षेत्रातील तिरोडा व गोरेगाव तालुक्याचा समावेश असून विद्यार्थी संख्या बघता पूरवठादाराकडून वेळेवर पुरवठा न होऊ शकल्याने गोंदिया तालुक्यातील शाळेतील विद्यार्थ्यांना येत्या १५ दिवसात वाटप होणार आहेत. तसेच इयत्ता ३ री व ४ थी च्या विद्यार्थ्यांनासुद्धा वाटप होणार असल्याची माहिती आमदार महोदयांनी दिली. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी बॅग भेट मिळाल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून आमदार महोदयांच्या या कार्याबद्दल कौतुक होत आहे.

Previous articleठाणाटोला येथे पंजाबराव देशमुख कृषी संजीवनी पंधरवाडा कार्यक्रम संपन्न
Next articleसुप्रसिद्ध गायिका पायल गौतम की गायन कला : एक समीक्षा