डॉ. परिणय फुके, होणार पुन्हा आमदार, भाजपची ५ नावांची यादी जाहीर

0
977

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी होणार निवडणूक

गोंदिया / महेंद्र लिल्हारे

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने 1 जुलै रोजी पाच नावांची घोषणा करून यादि जाहीर केली आहे.

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने जाहीर केलेल्या यादीनुसार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना स्थान देण्यात आले आहे. यामध्ये पंकजा मुंडे, डॉ.परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर, आणि अमित गोरखे यांच्या नावांना सिक्का मोर्तब (स्वीकृति) करण्यात आला आहे.

डॉ.परिणय फुके हे विदर्भातील कुणबी समाजाचे मोठे नेते आणि आवाज आहेत. फुके हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे आणि खंदे समर्थक मानले जातात.

सन 2016 ते 2022 या कालावधीत ते विधानपरिषदेचे सदस्य होते. त्यांची लोककल्याणकारी कामे पाहून त्यांना काही काळ राज्याचे मंत्री आणि भंडारा-गोंदिया दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री होण्याचा मानही मिळाला.

आता पुन्हा एकदा भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने त्यांचे नाव निश्चित केल्याने भाजप कार्यकर्ते आणि त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे.

भाजपकडून मिळालेल्या आदर आणि विश्वासाबद्दल डॉ फुके यांनी वरिष्ठांचे मानले आभार …

आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी पक्षाने उमेदवारी दिल्याबद्दल डॉ. परिणय फुके म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या पक्षनेतृत्वाने माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाने मला अभिमान आहे. पुन्हा एकदा विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी दिल्याबद्दल देशाच्या पंंतप्रधान मा.नरेंद्र मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष. मा.जे.पी.नड्डा, मा. गृहमंत्री अमितभाई शाह, केंद्रीय मंत्री मा. नितीन गडकरी,मा. बी.एल. संतोष, राज्याचे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस,आमचे नेते व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांचा मी मनःपूर्वक आभारी आहे.

फुके म्हणाले, माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवून विधान परिषदेच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल पक्ष नेतृत्वाचे आभार मानायला माझ्याकडे शब्द नाहीत. पक्षनेतृत्वाने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, तो पूर्ण करण्याचा मी सदैव प्रयत्न करीन आणि भारतीय जनता पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता बनून पक्षासाठी समर्पितपणे काम करत राहीन.

Previous articleसुप्रसिद्ध गायिका पायल गौतम की गायन कला : एक समीक्षा
Next articleश्री गजानन महाराज हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय घाटटेमनी येथे नवागतांचे औक्षवन करून स्वागत