श्री गजानन महाराज हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय घाटटेमनी येथे नवागतांचे औक्षवन करून स्वागत

0
154
1

आमगांव : गेल्या दीड महिन्यांपासून शाळेच्या भिंती अबोल होत्या. शाळेचा घंटाही शाळेच्या एका कोपऱ्यात होता. मात्र सोमवार, १ जुलैपासून नव्या शैक्षणिक सत्राला सुरवात झाली अन् शाळेच्या भिंती बोलक्या झाल्या. सोमवारी पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी शाळेत बऱ्यापैकी हजेरी लावत एकच किलबिलाट केला. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळाही सजल्या होत्या.मुख्याध्यापक, शिक्षक, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गुलाबपुष्प आणि मिष्टान्न देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

आमगांव तालुक्यातील श्री गजानन महाराज हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय घाटटेमनी येथे शाळेच्या पहिल्या दिवसी विद्यार्थ्याच्या प्रवेशोत्सवात  नवीन सत्र 2024-25 च्या  वर्ग ८ वी च्या विद्यार्थ्यांना पुस्तके , वह्या , पेन, शालेय गणवेश ईत्यादि चे वाटप संस्थेच्या पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच वृक्षारोपण सप्ताह च्या निमित्ताने शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले,व मिष्ठान्नाची मेजवानी देण्यात आली. त्यात सहभागी मुख्याध्यापक झेड. ए. रहांगडाले , हरितसेना प्रभारी व्हि. एस. मेंढे, संस्थेचे पदाधिकारी धनलाल हेमने, महेंद्र देशमुख, सोमाजी ठाकरे , डॉ. कैलास हेमने सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.