वर्धा जिल्हा प्रतिनिधी : गजानन पोटदुखे
दिनांक :-2 जुलै 2024
देवळी शहरात बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद शाखा देवळी यांच्या कार्यकर्त्यांनी केली स्मशानभूमीची सर्व साफसफाई. सेवा, सुरक्षा आणि संस्कार या मूल्यांची जोपासना करीत बजरंग दलआणि विश्व हिंदू परिषद च्या सर्व कार्यकर्त्यांनी 30 जून रविवारी सकाळी 7 वाजे पासून 10 वाजेपर्यंत 3 तास देवळी येथील स्मशानभूमीत झालेला सर्व कचरा, निर्माल्य, वाढलेले गवत, झाडे झुडपे सर्व कचऱ्याची विल्हेवाट लावली. बजरंग दलआणि विश्व हिंदू परिषद च्या सर्व कार्यकर्त्यांनी श्रमदान करीत एक नवीन उपक्रम राबविला. यावेळी बजरंग दल वर्धा जिल्हा सहसंयोजक दिनेश क्षीरसागर, मोहन जोशी, संजय कामडी, गजानन महल्ले, गोल्डी बग्गा, नानूभाऊ पांडे,अनिल क्षीरसागर, अमोल गोडबोले, प्रवीण तेलरांधे,मंगेश शेंडे, गजानन पोटदुखे, श्याम पोटदुखे, विनोद समर्थ,लक्ष्मण इंगोले, गजानन नासरे, तुकाराम कामडी, सागर गोमासे, सोहन गोमासे,रोहित कुमरे शुभम कैकाडी, रुपेश वानखेडे, सतीश बुट्टे, गजानन मेंडुले,इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

