प्रतिनिधी अभिजित कोलपाकवार
आष्टीः आष्टी येथे विजेच्या समस्याबाबत दैनिक देशोन्नती वृत्तपत्राने वारंवार बातम्या लिहून महावितरण विभाग तसेच प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर आष्टीवासीय नागरिकांनी महावितरणाच्या विरोधात पोलीस निरीक्षक विशाल काळे सर यांना निवेदन देऊन मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
मागच्या वर्षी आष्टी येथील
लाईन वारंवार जात असल्यामुळे अनेक समस्या निर्माण होत होत्या.
काही नागरीकांच्या घरातील टि.व्ही. फ्रीज, कुलर, एसी बिघडले. त्यानंतर आष्टी येथे ३० ते ४० लाख रुपये खर्च करुन सेपरेट फीडर बसविण्यात आले. यामुळे २ महिने लाईट सुरळीत होती. मात्र आता पावसाळा सुरु झाल्यानंतर सातत्याने विद्युत पुरवठा खंडीत होत आहे.
याचा आष्टीवासीयांना फटका बसत आहे.
मात्र महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.यामुळे संतापलेल्या नागरीकांनी ४ दिवसात आष्टीत लाईटची व्यवस्था सुरळीत न झाल्यास महावितरण विभागाला ताळे ठोकण्यात येईल व दि. ०५ जुलै २०२४ रोज शुक्रवारला आष्टी येथील मुख्य चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून दिला आहे. यावेळी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.