प्राणहिता कॅम्प ते अहेरी पर्यंत रस्ता बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करा : अन्यथा आंदोलन! कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आलापल्ली यांना अजय कंकडालवार यांनी दिले निवेदन.

0
85
1
  1.   अहेरी : सार्वजनिक बांधकाम विभाग आलापल्ली अंतर्गत सुरू असलेल्या आलापल्ली रोड वरील प्राणहिता कॅम्प ते अहेरी पर्यंत रस्त्याला सुरुवात होऊन भरपुर कालावधी झालेला आहे.सदर काम कासव गतिने सुरू असल्यामुळे या रस्त्याने शाळेत जाणारे विद्यार्थी वेगवेगळ्या विभागात असलेले अधिकारी/कर्मचारी व नागरिक दररोज दुचाकी व चारचाकी तसेच बसणे ये-जा करीत असतात.

 

सदर वाहनधारकांना अपूर्ण व कासव गतिने सुरू असलेल्या कामामुळे नाहक त्रास सहन करावे लागत असुन रस्त्याच्या कडेला गिट्टी टाकुन असल्यामुळे अपघाताची शक्यता आहे.सदर बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे सदर रस्त्याचे चौकशी करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे.नियमानुसार सदर रस्त्याचे काम ७-८ दिवसात पूर्ण करण्यात यावे.अन्यथा दिनांक ०९/०७/२०२४ रोजी आदोलन उभारण्यात येईल असा इशारा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी निवेदनातून दिला आहे.

 

सदर निवेदन जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली,कार्यकारी अभियंता,अप्पर जिल्हाधिकारी अहेरी,यांना माहितीस्तव व कार्यवाहीस्तव निवेदन पाठविण्यात आले आहे.