आमगांव : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत एकही लाभार्थी योजनेतून वंचित राहू नये करिता लाभार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला तत्काळ वितरित करण्यात यावा करीता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमगाव च्या वतीने नरेश कुमार माहेश्वरी माजी म्हाडा सभापती यांचे नेतृत्वात तहसीलदार आमगाव यांना निवेदन देण्यात आले.
शासनाद्वारे माझी लाडकी बहीण योजना लागू करण्यात आली व त्याची अंमलबजावणी एक जुलैपासून होणार असून त्याकरिता 15 जुलैपर्यंत आवेदन सादर करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत, परंतु या संदर्भात लागणाऱ्या विविध दस्तावेजामध्ये चौकशी अहवाल उत्पन्नाचा दाखला व अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असून याकरिता तहसील कार्यालयात भगिनींना मोठ्या रांगा लावाव्या लागत आहेत व हे कार्य ज्या गतीने सुरू आहे त्यानुसार वेळेचे आत प्रमाणपत्र मिळणे शक्य नाही याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस आमगाव च्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार आमगाव यांची भेट घेऊन निवेदन देऊन या कामात गती निर्माण करण्याकरिता तहसील कार्यालयात टेबल संख्या वाढविण्यात यावी तसेच तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक व संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांना सदर कामाकरिता प्राधान्य देण्याची सूचना करण्यात यावी व सहकार्य करावे अशा आशयाचे निवेदन देऊन या योजने संदर्भात येणाऱ्या अडचणी संबंधाने सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी प्रामुख्याने नरेश कुमार माहेश्वरी, कमलबापू बहेकार, राजेश भक्तवर्ती, सीमाताई शेंडे, रवी क्षीरसागर, विनोद कन्नमवार, कविताताई रहांगडाले, जियालाल पंधरे, लोकनाथ हरिणखेडे, तुलेंद्र कटरे, प्रमोद शिवणकर, स्वप्निल कावडे, सुमित कन्नमवार, राजकुमार प्रतापगडे, संजय रावत, बबलू बिसेन, रमण डेकाटे, तुकडोजी रहांगडाले, आनंद शर्मा, आकाश गुप्ता, उमेश मेश्राम, नामदेव दोनोडे, संतोष रहांगडाले, शालिकराम येडे, जयप्रकाश पटले, शंकर काटेखाये, गणेश रामटेके, योगराज तावाडे, श्रावण सोनवणे, राजेंद्र शिवणकर व मोठ्या संख्येने रा.का.पा.चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

