

आदिवासी विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास करणे हे शिक्षकांचे कर्तव्य…….. डॉ शायली चिखलीकर
देवरी : आश्रम शाळा ही आदिवासी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी कटिबद्ध असून शासकीय आश्रम शाळा पुराडा येथील प्राचार्य व शिक्षकांनी अतिशय उत्तम रितीने विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत हे शिक्षकांचे परम कर्तव्य आहे, आता पालकांनी नियमितपणे आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्याची आवश्यकता आहे. असे उद्गार नवोगतांचे स्वागत करताना प्रवेशोत्सव प्रसंगी पालक मेळाव्याला उद्बोधन करतांना देवरी प्रकल्पातील सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ शायली चिखलीकर यांनी अध्यक्षीय भाषणातून काढले.
शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा पुराडा येथे दि.१ जुलैला प्रवेशोत्सव निमित्त पालक मेळाव्याचे व नवोगतांचे स्वागत कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते ,त्या कार्यक्रमाचे उद्घाटक महिला बालकल्याण सभापती सौ.सविताताई संजय पुराम,ग्रा.प.पुराडा चे सरपंच लक्ष्मीशंकरजी मरकाम, ढिवरीनटोला चे सरपंच दिलीपजी जुळा, कार्यक्रमाचे अध्यक्ष सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ.शायली चिखलीकर ,विशेष अतिथी प.स.सदस्या सौ.वैशालीताई पंधरे,प.स.सदस्या सौ.ममताताई अंबादे, उपसरपंच रामेश्वरजी आचले, पोलीस पाटील सुभाष अंबादे,शा.व्य.अध्यक्ष मंगलाताई वट्टी, उपाध्यक्ष रजनीताई राठी, सालेकसा पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक भुषण बुराडे, मुल्ला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.सुजाता ताराम तसेच शा.व्य.समीतीचे सदस्य,ग्रा.प.चे सदस्य गण, निमंत्रित पाहुणे,पालक मंडळी व विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते,यावेळी विद्यार्थ्यांची गावातून प्रभातफेरी काढण्यात आली, विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तकला व शैक्षणिक साहित्य प्रदर्शनी चे उद्घाटन करण्यात आले, वर्ग १ ली तील नवोगतांचे गुलाब पुष्प, स्कूल बॅग,चाकलेट, पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे वर्ग १० वी,१२ वी तील प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आले,जेईई,एमएचटी सीईटी, एकलव्य मध्ये निवड झालेल्या व ग्रंथालयातील सत्र २०२३-२४ च्या नियमितपणे वाचकांचे सत्कार करण्यात आले, उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना गौरविण्यात आले, यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले, सर्व शिक्षकांनी आपापला परीचय दिल्यानंतर कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविकेतून प्राचार्य कमल कापसे यांनी शाळेत वर्षभरात राबविण्यात आलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमाविषयी इत्यंभूत माहिती दिली, वैद्यकीय अधिकारी डॉ सुजाता ताराम यांनी आरोग्याची काळजी व सिकलेल विषयीची सविस्तर माहिती दिली, पोलिस निरीक्षक भुषण बुराडे यांनी पोक्सो व नवीन कायदे विषयक माहिती सांगितली, उपस्थित मान्यवरांनी अतिशय उत्तम रीतीने आपापले विचार मांडले,अध्यक्षिय भाषणातून डॉ शायली चिखलीकर यांनी विद्यार्थ्यांना पालकांना व शिक्षकांना गोंडी भाषेतून अतिशय मार्मिक मार्गदर्शन केले,ब्रायटर माईंड विषयावर प्रा.संदीप बिसेन हे सविस्तर बोलले,यावेळी विद्यार्थ्यांच्या हस्ते व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले, सर्वच उपस्थितांनी गोड भोजनाचा आनंद घेतला, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील संपूर्ण शिक्षक, अधिक्षक अधिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गांनी अथक परिश्रम घेतले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.वैयजंती नेनावत यांनी तर आभारप्रदर्शन प्रा.राजेश हट्टेवार यांनी केले.

