जिल्हा प्रतिनिधी/ सतीश पटले
तुमसर तालुक्यातील चिखला, आष्टी, गर्रा बघेडा जिल्हा परिषद क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याकरिता किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महासचिव तथा भंडारा गोंदिया जिल्ह्याचे माजी खा. शिशुपाल पटले, किसान मोर्चा भंडारा जिल्हाध्यक्ष डॉ. हरेंद्र रहांगडाले यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याकरिता जनसंपर्क दौरा आयोजित केला होता. या दौऱ्यादरम्यान क्षेत्रातील कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात माजी खा. शिशुपाल पटले यांनी शेतकऱ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कार्यकर्त्यांच्या सांगितल्याप्रमाणे वरील क्षेत्राचे शेतकरी हा अनेक समस्या पासून ग्रस्त आहेत. त्यांच्या समस्या शासन दरबारी ठेवू असे आश्वासन माजी खा. शिशुपाल पटले व डॉ. हरेंद्र रहांगडाले यांनी दिले. यामध्ये नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची प्रोत्साहन राशी ताबडतोब देण्यात यावे, शेती पंपावरची विद्युत बिल संपूर्णपणे माफ करण्यात यावे, सध्या घरगुती विद्युत मीटरचे बिल दुपटीने वाढले आहेत त्यामध्ये युनिटचे टप्पे निश्चित केले आहे त्यामध्ये सामान्य व्यक्तीलाही आर्थिक भूदंड सोसावा लागतो यात 100 युनिटची अट न ठेवता जेवढे युनिट जळत असतील तसे एकच दर ठेवून सरासरी बिल आकारणी करण्यात यावे, तसेच शेतकऱ्यांची शेतीसाठी सेंद्रिय खते अनुदानित रूपात शेतकऱ्यांना सबसिडी देण्यात यावे, गोबरवाही परिसरातील 13 गावांना बावनथडीचे पाणी सिंचनासाठी उपलब्ध करण्यात यावे. असे अनेक प्रश्न या जनसंपर्क दौऱ्यात शेतकऱ्यांकडून उपस्थित करण्यात आले. यावेळी हे सर्व प्रश्न शासन दरबारी ठेवण्याची हमी देण्यात आली. याप्रसंगी राजापूरचे सरपंच महाप्रसाद परबते, माजी सरपंच अशोक ठाकूर, डॉ. किशोर झोडे ,रूपा सोनेवाने, संजू जयस्वाल, युवराज पारधी, रवी लांजेवार, कल्याण उईके, मनिराम मस्की, रामप्रसाद बारागवणे, देवानंद परबते, जितेंद्र भटेरे तसेच शेतकरी वर्ग व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home आपला विदर्भ भंडारा नियमित कर्ज भरणारे शेतकरी प्रोत्साहन राशीपासून वंचित, माजी खा. शिशुपाल पटले यांच्या...