वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- गजानन पोटदुखे
दिनांक :-4 जुलै 2024
देवळी (भिडी) येथील युवतीवर कैचिने केले वार करण्यात आले. युवती ही वर्धा येथून कॉलेज आटपून घरी जात असताना. दबा धरून बसलेल्या आरोपी संदीप दिलीप मसराम वय (25)वर्ष रा. भिडी युवककाणे युवतीवर सायंकाळच्या सुमारास अचानक प्राणघातक हल्ला केला. हल्ला होताच युवतीने आरडाओरड केली त्यामुळे परिसरातील नागरिक धावून गेले. आणि आरोपीला पकडले. सदर युवती ही गंभीर जखमी झाली असून तिला सामान्य रुग्णालय वर्धा येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. आरोपी युवक हे युवतिच्या शेजारी राहतो.आरोपी ला देवळी पोलीसानी त्वरित अटक केली असून आरोपी विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास देवळी पोलीस करीत आहे.

