“पालक मेळावा व वृक्षारोपण”आयोजन संपन्न

0
138
1

गोंदिया : जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा पाथरी येथे सत्र 2024-25 या वर्षातील प्रथम पालक मेळाव्याचे आयोजन आज दिनांक 4 जुलै 2024 ला करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत पाथरी येथील सरपंच माननीय श्रीमती हिरण ताई तीरेले या होत्या. कार्यक्रमाचे उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. केशवराव घरत हे होते.कार्यक्रमाचे दीप प्रज्वलक म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य मा. केवल भाऊ बघेले हे होते. प्रमुख अतिथी मध्ये ग्रामपंचायत पाथरी येथील उपसरपंच मा.घनेश्वर तीरेले होते.तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सौ भुमेश्वरा बुरेले व मा. संजय चेन्नई,पत्रकार हे होते.

इयत्ता पहिली ते सातवी मधील विद्यार्थ्यांच्या पालक वर्गांनी पालक सभे मध्ये सहभाग घेतला. गुणवत्ता पूर्ण शिक्षण, कम्प्युटर शिक्षण, विद्यार्थ्यांच्या योग्य सवयी, अभ्यासाची आवड निर्माण करणे इत्यादी विविध विषयांच्या माहिती याविषयी सांगोपांग चर्चा करण्यात आली. तदनंतर सर्वांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा पाथरी येथील प्रशस्त प्रांगणात वृक्षारोपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आंबा, जांभूळ ,गुलमोहर ,पिंपळ, नीम,करंजी इत्यादी पंचवीस रोपे लावण्यात आली.सदर कार्यक्रमास शाळेच्या उच्च श्रेणी मुख्याध्यापिका कु. अंजनाबाई राणे मॅडम ,श्री आर वाय गजभिये, पदवीधर शिक्षक, कुमारी सुप्रिया रंगारी ,सौ निर्मला पटले हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालक श्री गजभिये यांनी केले तर आभार प्रदर्शन कुमारी रंगारी मॅडम यांनी केले.