नागरिकांची निवेदनातून प्रशासनाला मागणी
सालेकसा / बाजीराव तरोने
गोंदिया जिल्ह्यामध्ये अति दुर्गम आदिवासी क्षेत्रात मोडत असलेल्या सालेकसा तालुक्यातील नगरपंचायत सालेकसा या नगरपंचायत क्षेत्रात ग्रामीण भाग मोडत असुन आमगांवखुर्द, हलबीटोला, सालेकसा, मुरुमटोला, जांभडी, बाकलसर्रा, कोवाचीटोला, रामनगर, गोंडिटोला हया गावांचा समावेश आहे. या नगरपंचायत भागातील नागरीकांना नगर पंचायत सालेकसा कडून करवाढीचे नोटीस देण्यात येत आहे आणि सदर नोटीस मध्ये करवाढीबाबद आक्षेप असल्यास ३० दिवसाचे आत व्ययक्तीक स्वरुपाने अपील करावे असे नमुद करण्यात आले आहे. हे सर्व नागरीकांना, महिलांना त्रासदायक ठरणार हे नक्की हया पुर्वीसुद्धा नागरीकांकडून मार्च महिन्यात निवेदन देवून आताच्या परिस्थितीला कुठलीही करवाढ करण्यात येवू नये असी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली असून प्रशासक मुख्याधिकारी तथा तहसीलदार सालेकसा नरसय्या गोंडागुर्ले यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी ब्रजभूषण बैस, सुनील असाटी,मायकल मेश्राम,अंकुश सुर्यवंशी, गणेश खोटेले,बाजीराव तरोणे ,भागचंद लिल्हारे, राहुल टेंभरे, निर्दोष साखरे, विक्की भाटिया, अनिल अग्रवाल, बबलू आंबाडारे, बळीराम पटले, शंकर मडावी, योगेश राऊत, विनय शर्मा, संतोष दुबे, रवींद्र उजवने यांनी निवेदन दिले.