
शेकडो महिलांनी घेतला सहभाग
सालेकसा / बाजीराव तरोने
महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम )गोंदिया महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनन्नोती अभियान अंतर्गत स्त्रीगौरव लोक संचालित साधन केंद्र कावराबांध (झालिया )याची आठवीं वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती . हया कार्यक्रमाला वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी मावीम गोंदिया संजय संगेकर , स्त्रीगौरव सीएमआरसी अध्यक्षा निशा बैठवार, सचिव छाया भगत , कोषाध्यक्ष रेखा मेश्राम , उपाध्यक्ष चित्रा नवगोडे, सहसचिव सारिका चौरीवार, सदस्या सरलाताई कटरे , पंचायत सभापति प्रमिला गणवीर, जिल्हा परिषद सदस्य छाया नागपुरे ,जिल्हा परिषद सदस्य विमल कटरे, माजी पंचायत समिति सदस्या प्रतिभा परिहार , पानलोट चे राजू पुंडे, मोटघरे आंगनवाडी पर्यवेक्षिका अस्मिता कटरे ,स्त्रीगौरव सीमआरसी लक्ष्मी नागदेवे , आर्गनिक BC आशा येडे , ऑर्गेनिक CC स्नेहलता रामटेके , सभेला उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाला उपस्थित मान्यवराच्या हस्ते सावित्रीमातेच्या प्रतिमेचे पूजन करून ,”इतनी शक्ति हमें देना दाता “ही प्रार्थना घेऊन स्वागतगीताने व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले . मान्यवराच्य हस्ते वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पुस्काचे विमोचन करुन महीला बचत गटा द्वारे उत्पादीत वस्तु विक्री केंद्राचे चे उद्घाटन करण्यात आले .वार्षिक सर्वसाधारण सभेची प्रास्ताविक माहिती सीएमआरसी व्यवस्थापक लक्ष्मी नागदेवे यानी सादर केले . यामध्ये सीएमआरसी अंतर्गत असलेले एकून गाव , गट , ग्रामसंस्था महीलाच्या सक्षमीकरणाकरीता चालविन्यात येनारे बचत गट, बैंक कर्ज ,कृषि अवजार बैंक, विविध योजनाची माहिती दिली. अहवाल वाचन अध्यक्षा निशा बैठवार यांनी केले. वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी यानी विविध योजना बद्दल माहिती दिली त्यामध्ये बचत गट कशा प्रकारे सक्षम करता येईल यावर माहिती दिली . महिलाचे उत्पन्न वाढवावे म्हणून विविध व्यवसाय करुण कच्या मालापासुन पक्का माल करुन पकेजिग ब्रैडिग करने, व्यक्तिगत कर्ज PMFME योजना, CMEGP, PMEGP योजना CMRC या माध्ययमातुन राबविन्यात येत आहे या बद्दल माहिती दिली. या कार्यक्रमाचे औचित्य साधुन आरोग्य तपासनी शिबीर आयोजित करण्यत आले होते .उत्कृष काम करनारया ग्राम संस्था ,बचत गट , LG , याना प्रोत्साहन पर बक्षीस देन्यात आले कार्यक्रमाचे संचालन दुर्गा देशमुख सहयोगिनी यानी केले .अध्यक्षीय मार्गदर्शन जिल्हा परिषद सदस्या विमल कटरे यानी केले . कार्यक्रमाचे आभार व्यक्त सुशीला बघेले सहयोगिनी यानी केले .
कार्यक्रमाला पार पाडन्याकरिता शालिनी मनघटे, रेखा राहंगडाले, मनीषा मछिरके , सुनीता राहंगडाले, संगीता मच्छीरके, लेखापाल , बैंक सखी सरिता बनोठे यानी अथक परिश्रम घेतले.

