नक्षल्यांच्या आयईडी स्फोटात दोन जवान जखमी

0
936
1

गडचिरोली, ता. ६: भामरागड तालुक्यातील धोडराज परिसरातून नक्षलविरोधी अभियान राबवून परत जात असताना आज सकाळी नक्षल्यांनी आयईडी स्फोट केल्याने दोन जवान जखमी झाले.अहेरी येथील प्राणहिता पोलिसउपमुख्यालयातील सी-६० पथकाचे जवान धोडराज पोलिस ठाण्यांतर्गत् परिसरातील जंगलात नक्षलविरोधी अभियान राबविण्यास गेले होते. अभियान आटोपल्यानंतर भामरागड पोलिस ठाण्याच्या दिशेने पायदळ येत असताना नक्षल्यांनी धोडराज-भामरागड मार्गावरील इंद्रावती नदीच्या पुलाजवळ क्लेमोरद्वारे आयईडी स्फोट केला. यात दोन जवानांच्या हाताला किरकोळ जखम झाली. मात्र, जवानांनी सतर्कता दाखवत नक्षल्यांचा मोठा घातपात करण्याचा प्रयत्न् हाणून पाडला. त्या परिसरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.