गोंदिया, दि.5 : राज्याच्या आर्थिक विकासात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या एमएसएमई (MSME) क्षेत्रावर भर देऊन त्यांची कार्यक्षमता व उत्पादकता वाढविणे, राज्यात उद्योजकीय वातावरण अधिक व्यापक करुन रोजगार, स्वयंरोजगार संधी मोठ्या प्रमाणात निर्माण करणे, एक जिल्हा एक उत्पादन उपक्रम व निर्यात वृध्दीस चालना देण्यासाठी तसेच उद्योगांच्या विकासाकरिता राज्य तसेच केंद्र शासनाचे विविध विभाग त्यांचे उपक्रम व योजना संचालनालयामार्फत राज्यात राबवित आहेत. सर्व योजनांची माहिती उद्योजकांना एकाच व्यासपीठावर उपलब्ध होण्याचा दृष्टीने संबंधित सर्व विभागाच्या सहकार्याने “IGINITE MAHARASHTRA-2024” या अंतर्गत जिल्हानिहाय एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करणेबाबत विकास आयुक्त (उद्योग) यांचे निर्देशास अनुसरुन 9 जुलै 2024 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यशाळेमध्ये व्यवसाय सुलभीकरणाकरिता मैत्री विभाग मुंबई, निर्यातीकरिता DGFT नागपूर, भांडवल करिता SIDBI, IDBI, CFTRI तसेच यशस्वी उद्योजक यांचे मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील उद्योजक, नवउद्योजक, निर्यातक्षम उद्योग, बँक प्रतिनिधी, औद्योगिक विकासाशी संबंधित विविध विभागाचे प्रमुख यांनी कार्यशाळेस उपस्थित राहून मार्गदर्शन सत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सारंग पटले यांनी केले आहे.