चार वर्षी पूर्वी अपघातात वडिलांचे छत्र हरविलेल्या परिणीतीचा चौथ्या वर्षाचा शैक्षणिक खर्च कुटुंबाकडे सुपूर्द………

0
429

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- गजानन पोटदुखे

दिनांक : -7 जुलै 2024

क्रांतिवीर महादेवराव ठाकरे प्रतिष्ठान व युवा संघर्ष मोर्चाचा संवेदनशील उपक्रम

.देवळी : क्रांतिवीर महादेवराव ठाकरे यांची १ जुलै रोजी जयंती निमीत्ताने महादेवरावजी ठाकरे यांचे कार्य व विचार जिवंत ठेवण्यासाठी क्रांतिवीर महादेवराव ठाकरे प्रतिष्ठान व युवा संघर्ष मोर्चाच्या वतीने दरवर्षी लोकहिताचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. २ एप्रिल २०२१ रोजी स्व.अंकुश अडेकार यांचे अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला. आधीच कुटुंबाची आर्थिक परिस्थिती जेमतेम असतांना अंकुश सारख्या कर्त्या पुरुषाचे अकाली जाण्याने कुटुंबाची परिस्थिती अधिकच बिकट झाली. यातच मुलीच्या शिक्षणाचा यक्ष प्रश्न पुढे आला. अशातच युवा संघर्ष मोर्चा व क्रांतिवीर महादेवराव ठाकरे प्रतिष्ठानच्या ही बाब लक्षात येताच कु.परिणीतीचा १२ वी पर्यंतचा शिक्षणाचा खर्च उचलण्यास पुढे सरसावले. युवा संघर्ष मोर्चा व क्रांतीवीर महादेवराव ठाकरे प्रतिष्ठान ने शैक्षणिक खर्च करण्याचे ठरविले होते. त्याप्रमाणे कु.परिणीतीचा चौथ्या वर्षीचा शैक्षणिक खर्च युवा संघर्ष मोर्चाच्या कार्यालयात कार्यक्रमामध्ये कुटुंबाकडे सुपूर्त करण्यात आला. कुटुंबाच्या वतीने कु.परिणीती अडेकार हिने मदत स्विकारली.यावेळी स्व.अंकुश अडेकार यांच्या पत्नी श्रीमती आरतीताई अडेकार यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करीत युवा संघर्ष मोर्चा व क्रांतीवीर महादेवराव ठाकरे प्रतिष्ठानचे आभार मानले. अत्यंत भावनिक रित्या हा कार्यक्रम युवा संघर्ष मोर्चाच्या कार्यालयात पार पडला.यावेळी किरण ठाकरे, शेख सत्तार व प्रविण कात्रे यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेच्या माध्यमातून संवेदनशील उपक्रम राबवित असल्याने महादेवरावजी ठाकरे यांच्या कार्याची पुनरावृत्ती होत असल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष किरण ठाकरे, प्रवीण कात्रे, गौतम पोपटकर,पत्रकार शेख सत्तार, पत्रकार समीर शेख, ज्ञानेश्वर इंगोले, अनिल हिंगे, प्रवीण फटींग, प्रविण ठाकरे, सौरभ नाखले, स्वप्नील मदनकर, मनोज नागपुरे, वैभव नगराळे, गौरव खोपाळ, निलेश तिडके, चेतन इंगळे, शरद भोयर, सचिन पडोळे, प्रवीण तराळे, वृषभ गावंडे, सुरज भगत, मयूर शेंडे, सागर पाटणकर अन्य सदस्यांची उपस्थिती होती.

Previous articleउद्योजकांसाठी 9 जुलैला कार्यशाळेचे आयोजन
Next articleपदवीपर्यंत शिक्षणावर मंत्रिमंडळात शिक्कामोर्तब