तीन राज्याला जोडणाऱ्या वाघ नदीवरील पुल जीर्ण अवस्थेत….

0
601

➡️ जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही जड वाहतूक सुरूच…

➡️ तात्काळ जड वाहतूक बंद केली नाही तर नागरिकांचा आंदोलनाचा इशारा…

आमगांव / धनराज भगत

गोंदिया जिल्ह्यातील आमगाव-सालेकसा या दोन तालुक्यांना व महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड या तिन्ही राज्यांना जोडणारा राज्य मार्ग क्र.३३५ वाघ नदीवरील पूल धोकादायक झाला आहे. या पुलावर मोठ्या भेगा पडल्याने असून, यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी या पुलावरून जड वाहतूक बंद करण्याचे आदेश देखील दि.१३ मार्च २०२३ रोजी काढले होते. मात्र, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले असल्याने विधिमंडळाच्या सुरू असलेल्या अधिवेशनात आ. सहषराम कोरोटे यांनी हा मुद्दा उपस्थित करून सभागृहाचे याकडे लक्ष वेधले.

# ह्या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे हे आहेत,मात्र या क्षेत्रातील अद्याप विकास झालेला नाही म्हणून त्यामुळे आमदारांच्या संदर्भात नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.#

तर आता आमगाव येथील नागरिकांनी देखील या पुलाची दुरुस्ती करण्यात यावी व जड वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी केली आहे. तर जड वाहतूक बंद झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

Previous articleरक्तदानापेक्षा मोठे दान नाही : अक्षय वरसे
Next articleदुचाकीच्या अपघातात शिक्षक गंभीर जखमी