दुचाकीच्या अपघातात शिक्षक गंभीर जखमी 

0
788

अहेरी /प्रतिनिधी

अहेरी सिरोंचा मार्गावरील गोलाकरजी गावाजवळ आज सकाळी १०. ३० च्या सुमारास कमलापूर च्या भगवंतराव शाळेचे सहायक शिक्षक सुनील तूरकर यांची दुचाकी रस्त्यावरून स्लिप झाल्याने शिक्षक गंभीर जखमी झाले आहेत. अहेरी सिरोंचा मार्गाचे काम अतिशय संथ गतीने सुरु आहे. याच्यामुळे या मार्गांवर अपघाताची मालिका वाढली आहे. प्रवश्याना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. पावसाळा सुरु झाल्याने व रस्ता दुरुस्ती चे काम सुरु असल्याने रस्त्यावर चिखल माती आली आहे. त्यामुळे या रस्त्यावर पाऊस आला की दुचाकी चालवणे कठीण झाले आहे. अपघात दुसरे शिक्षक प्रवीण चौधरी हे सुद्धा किरकोड जखमी झाले आहेत. पंचायत समिती अहेरी चे विशेष शिक्षक नागरे सर व इतर नागरिकांनी वेळीच धाव घेत जखमीना आलापल्ली येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. शिक्षक सुनील तूरकर यांच्यावर उपचार सुरु आहे. अहेरी उपविभागात अपघाताची मालिका दररोज सुरु आहे. खराब रस्त्यामुळे आणखी किती लोकांचा बळी जाते? असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.

Previous articleतीन राज्याला जोडणाऱ्या वाघ नदीवरील पुल जीर्ण अवस्थेत….
Next articleजिल्हास्तरीय योगासन स्पर्धेचे आयोजन