आमगाव : गोंदिया जिल्हा योगासन स्पोर्टस असोसिएशन द्वारे दि. २७ व २८ जुलै २०२४ ला योग भवन, गोंदिया येथे जिल्हास्तर योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यान आले आहे. स्पर्धेत विजयी झालेले खेळाडू संगमनेर जि. अहमदनगर येथे होणाऱ्या राज्यस्तर योगासन स्पर्धेत गोंदिया जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील.
जिल्हास्तरीय स्पर्धा सब ज्यूनिअर, ज्युनियर, सीनिअर, सिनियर ए, बी, सी अशा सहा गटात होतील. स्पर्धेचे शुल्क १०० रु व २०० रु. असे आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडूंना गूगल फॉर्म द्वारे दि. २२ जुलै पर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. स्पर्धेत सहभागी खेळाडूना आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र, जोखीम प्रमाणपत्र, फिटनेस प्रमाणपत्र व दोन पासपोर्ट फोटो स्पर्धेच्या ठिकाणी जमा करावे लागेल.स्पर्धा पारंपारिक, कलात्मक एकल, कलात्मक जोडी व लयबद्ध जोडी अशा चार प्रकारात होईल. स्पर्धक चारही प्रकारात सहभागी होऊ शकतात,त्यासाठी त्यांना प्रत्येक प्रकाराचे स्वतंत्र शुल्क भरावे लगेल.
स्पर्धेसाठी मुले व पुरुषांना स्लैक्स (टायती) व टी-शर्ट पोशाख व मुलींना योगा कॉस्ट्यूम पोशाख आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी सचिव विनायक अंजनकर (7507001995), शशांक कोसरकर (9637551827), दिव्या भोजरानी (7020757043), रवीशंकर नागपूरे (7721888060), सुमती डोलारे (8999614344) इत्यादिशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

