आदिवासी भागात रानभाज्या आहारात

0
315

भामरगड – जंगलात , बांधावर, माळरानात रानभाज्या दिसून येतात. यांत अनेक औषधी गुणधर्मही असतात त्या आवर्जून जनतेने खाल्या पाहिजे . कुड्याची भाजी, तोरुटा भाजी, जंगलालगतचे आदिवासी आजही त्यांचे पारंपरिक अन्न म्हणून जंगलातील वनस्पतींचाच वापर करतात. ऋतूनुसार त्यांना या भाज्या सहज उपलब्ध होत असून. त्यांच्या जुन्या पिढीतील भाज्यांचे हे ज्ञान नव्या पिढीतही कायम असून या वनस्पती त्यांच्या दैनंदिनखाद्यान्नातील अविभाज्य घटक आहेत. त्यांना ऋतुमानानुसार रानभाज्या सहज उपलब्ध होत असल्याने या वनस्पतींची त्यांना पूर्ण माहिती असते. तेच त्यांचे पारंपरिक अन्न आहे आणि त्याविषयीचे ज्ञान नव्या पिढीपर्यंत सहजरीत्या पोहोचते. या वनस्पतींपैकी काहींचा वापर ते विशिष्ट सणादरम्यान, तर काही विशिष्ट दिवशीच खातात. यावरून निसर्गाशी जुळलेली त्यांची नाळ अधोरेखित होते. या गावातील तरुणांनाही या वनस्पतींचे महत्त्व आणि पूर्ण ज्ञान आहे. या वनस्पतींपासून आदिवासी विविध पदार्थ बनवितात. भाज्यांचा रस्सा तयार करण्यापासून तर उकळून, भाजून, वरण, भजी आदी खाद्यान्न यांपासून तयार केले जाते. एवढेच नव्हे, तर पोळ्यांसाठीही याच वनस्पती वापरतात. काही भाज्या थंड तर काही उष्णधर्मीय असतात. खोकला, सर्दी, ताप, दम्यावर उपचार म्हणून वाकळीसारख्या रानभाज्या आवर्जून खाल्ल्या जातात. कुडा हा रानपाला पोटदुखीसाठी रामबाण उपाय मानला जातो. तर रानकेळ्यांमध्ये खोकला बरा करण्याची क्षमता असते. टाकळ्याची भाजी दिसायला मेथीसारखी मात्र अधिक कडवट-तुरट चवीची असते. कोंब आलेली भारंगी, शेकट्यांच्या भाजीमध्ये प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात. कुळू वा कुवाळूचची भाजी ही गवतासारखी असते. त्यामुळे यात अनेकदा विषारी गवतही वाढते. कुवाळूचा मुळाकडचा भाग हा पांढराशुभ्र असतो. गवत हिरव्या गडद रंगाचे असते. विषारी गवताची पाती चपटी असतात. हा फरक सरावाने ओळखता येतो, अशी माहिती रानभाज्यांचा महोत्सव आयोजित करणारे यशोधन देशमुख देतात. शेवळं म्हणजे पांढऱ्या मशरुम्सचाच एक महत्त्वाचा प्रकार. यात सेक्रोमायसिस इस्ट अधिक असते. अन्य भाज्यांमध्येही या इस्टचा नैसर्गिक थर असतो. सेक्रोमायसिसच्या अतिरिक्त थरामुळे घशात खवखव होणे, खाज आल्यासारखे वाटते. त्यामुळे या भाजीसोबत विक्रीला ठेवली जाणारी फळेही विकत घ्यायला हवीत. त्यामुळे खवखवीसारखी लक्षणे नष्ट होतात. या भाज्यांमध्ये लोह, खनिज यांचा भरपूर साठा असल्याने त्यांचा आस्वाद पावसाळ्याच्या दिवसांत शाकाहारी वा मांसाहारी अशा कोणत्याही जेवणासोबत घ्यायला हवा. जंगलात मिळणाऱ्या रानभाजी शेकडो वर्षांपासून त्यांनी त्या रानभाजी सेवन करत असल्याने त्यांना ते शक्तीवर्धक ठरत असून ते त्यांचे ह्यूमिनिटी बूस्टर आहे. यामध्ये चावावेल,कार्टुल,शेऊळ,शेवाळे,कुळ्याचे फुल,चारा,घोळ,रताळयाचे कोंब,भोपा, चायवळ,मशरूम काटवल आणि पावसाळ्याच्या दिवसात जंगलात विविध प्रकारच्या रानभाज्या मिळत असतात आणि प्रामुख्याने गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी समाजातील नागरिक सेवन करत असल्याने त्यांच्यामध्ये विपुल प्रमाणात रोगप्रतिकारकशक्ती असते. जंगलात उगवणाऱ्या रानभाज्यांमध्ये विपुल प्रमाणात प्रोटिन्स असतात आणि प्रत्येक रानभाजी औषधी गुणधर्म असतात.

कारण ते निसर्गाच्या सानिध्यात वाढले असतात म्हणजे रसायन विरहित पदार्थ असल्याने ते शरीरासाठी उपयुक्त असतात. म्हणून नागरिकांनी रानभाज्याचा भरपूर प्रमाणात आस्वाद घ्या.

प्रा. डॉ. कैलास वी. निखाडे

निर्सग अभ्यासक

9423638149,9403510981