मतांची कड़की अन् बहीण झाली लाडकी

0
420
1

आजच्या समाजात महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना अस्तित्वात आल्या आहेत. लाडकी बहीण योजना हा ही योजनेचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामुळे महिलांना आर्थिक मदत मिळते. पण जर महिलांना योग्य वेळी उच्च शिक्षणाची संधी मिळाली असती, तर त्यांना अशा या योजनांची गरज भासली नसती. शिक्षण हे प्रत्येकाच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचे स्थान घेते. उच्च शिक्षण केवळ रोजगाराच्या संधी मिळवून देत नाही, तर व्यक्तिमत्वाचा विकास, विचारशक्तीचा विकास, आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढवते. शिक्षणामुळे महिलांना स्वतंत्रपणे विचार करण्याची आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद मिळते. माझ्या बहिणीसारख्या अनेक महिलांना योग्य वेळी उच्च शिक्षणाची संधी मिळाली असती, तर त्यांना आज लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी रांगेत उभे राहावे लागले नसते.                                   आजही आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये अनेक सुधारणा करणे आवश्यक आहे. शिक्षण प्रणाली अधिक सुलभ, आणि सर्वसमावेशक करणे गरजेचे आहे. ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये शैक्षणिक सुविधा समान पातळीवर असाव्यात. महिलांच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्न केले जावेत, जसे की शिष्यवृत्ती, वसतिगृह सुविधा, आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रम.
         शिक्षणाच्या विकासासाठी सरकार आणि समाजाच्या दोघांचाही सहभाग आवश्यक आहे. सरकारने शिक्षण क्षेत्रात अधिक गुंतवणूक करावी, शाळा आणि महाविद्यालयांच्या सुविधा वाढवाव्यात, आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करावे. समाजाने मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन द्यावे, आणि त्यांच्या उच्च शिक्षणासाठी आवश्यक तो आधार द्यावा.
जर महिलांना योग्य वेळी उच्च शिक्षणाची संधी दिली, तर त्यांना कोणत्याही योजनांच्या मदतीची गरज भासणार नाही. त्या स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःला सशक्त करू शकतात आणि समाजात आदर्श बनू शकतात. त्यामुळे शिक्षण प्रणालीचा विकास आणि सुधारणा करणे अत्यंत आवश्यक आहे. शिक्षणाच्या विकासातच आपल्या देशाचे आणि समाजाचे उज्ज्वल भवितव्य दडलेले आहे. महिलांना उच्च शिक्षणाची संधी दिली, तर त्या स्वतःच्या सामर्थ्यावर उभ्या राहू शकतात आणि समाजाच्या विकासात मोलाचे योगदान देऊ शकतात. त्यामुळे आता तरी शिक्षण प्रणाली विकसित करण्यावर भर देणे गरजेचे आहे. आणि महायुती सरकार ने फोडा- फोडी चे राजकारण केल्याने सरकारला लोकसभा निवडणुकीत चांगलाच फटका बसला, पण येत्या विधानसभा निवडणुकीत फटका बसू नये म्हणून राज्य सरकार ला बहीण आणि भावाची आठवण आलेली आहे दिसून येत आहे.

– सुमित ठाकरे,आमगांव                                           विद्यार्थी, पत्रकारिता (द्वितीय वर्ष)