नगरपंचायत एटापल्ली येथे बस व रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न
लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या वतीने एटापल्ली नगरपंचायत क्षेत्रातील शाळकरी विद्यार्थ्यांन करिता दिलेले बस व एटापल्ली तालुक्यातील नागरिकांना वेळीच उपचार मिळण्याकरिता रुग्णवाहिकेचे लोकार्पण सोहळा नगरपंचायत एटापल्ली तर्फे नगरपंचायतीच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले होते.सदर बस व रुग्णवाहिकेचे लोकार्पण मा.दिपयंती पेंदाम नगराध्यक्षा नगरपंचायत एटापल्ली व मा.एस.व्यंकटेश्वर व्यवस्थापकीय संचालक लॉयड मेटल्स कंपनी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा.चैतन्य कदम उपविभागीय पोलीस अधिकारी एटापल्ली,मा.घागुर्डे साहेब तहसीलदार एटापल्ली, मा.आदीनाथ आंधळे गटविकास अधिकारी एटापल्ली, मा.निलिमा खोब्रागडे वनपरिक्षेत्र अधिकारी एटापल्ली, मा.गटशिक्षण अधिकारी, मा.साईकुमार सर, मा.बलराम सोमनानी, राघवेंद्र सुल्वावार बांधकाम सभापती नगरपंचायत एटापल्ली, नामदेव हिचामी पाणीपुरवठा सभापती, जितेंद्र टिकले नगरसेवक, राहुल कुळमेथे नगरसेवक, निजान पेंदाम नगरसेवक, निर्मला कोंडबत्तुलवार नगरसेविका, निर्मला हिचामी नगरसेविका तसेच विद्यार्थ्यांचे पालकवर्ग नागरिक मोठ्या संख्येने उपस्तीत होते.