विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेकरिता सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे – ब्रजभूषण बैस

0
236

सालेकसा/बाजीराव तरोने

सालेकसा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय ही शाळा तालुक्यातील सगळ्यात जुनी शाळा म्हणून ओळखली जाते. सालेकसा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय ही राज्य महामार्गाच्या लगत असून विद्यार्थ्यांबरोबर कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.                                                       या शाळेत वर्ग पाचवी ते वर्ग बारावी पर्यंत 1000 च्या वरून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत अशा वेळी या विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेने करिता विशेषता मुलींच्या सुरक्षा दृष्टीने शाळेच्या आवारात सीसीटीव्ही प्रणालीचे कॅमेरे बसविण्यात यावे ज्याच्यामुळे विद्यार्थी व त्यांच्या पालकांमध्ये आपल्या पाल्यांच्या सुरक्षेची भावना निर्माण होईल. या करिता आज तालुक्यातील पालक वर्ग व नागरिकांच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक आर बी वैद्य यांना निवेदन देण्यात आले निवेदन देतेवेळी सामाजिक कार्यकर्ते ब्रजभूषण बैस, अजित सिंग बैस,प्राध्यापक राकेश रोकडे, विनोद गजबे, रोहित गभने,सागर उके आदी उपस्थित होते.