

गोंदिया : विकासाचे ध्येय ठेवून खासदार प्रफुल पटेल यांची भूमिका स्पष्ट आहे. आपल्या क्षेत्राचा विकास व्हावा सर्वसामान्य जनतेला अडी अडचणींचा सामना करावा लागू नये जनतेची कामे लवकर होतील तर विकासाचे चक्रे जलद फिरतात हीच भूमिका प्रफुल पटेल यांनी घेतली आहे. शेतकऱ्यांच्या धानाला बोनस, गोंदिया येथे मेडिकल कॉलेज, क्षेत्राच्या विकासासाठी विविध कामांना निधी उपलब्ध करून देणे. महायुती सरकारच्या वतीने अमलात आणलेली अनेक जन हिताची कामे जनतेपर्यंत पोचविण्याचे काम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करावे असे कार्यकत्यांना संबोधतांना राजेंद्र जैन बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची फुलचूर जिल्हा परिषद क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची संघटनात्मक बैठक पाटील लॉनं, आंबाटोली फुलचूर येथे माजी आमदार राजेंद्र जैन, कुंदन कटारे, केतन तुरकर, केवल बघेले, नीरज उपवंशी, अखिलेश सेठ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
जैन पुढे म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहून महायुतीचा उमेदवार निवडून येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ता व पदाधिकारी यांनी कामाला लागून युवक व महिलांना सक्रियतेने विविध योजनांचा लाभ देण्याचे कार्य करावे तसेच प्रत्येक बुथ वर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची कमेटी बनविण्याचे काम करावे असे आवाहन त्यांनी केले.
सर्व श्री राजेंद्र जैन, कुंदन कटारे, केतन तुरकर, केवल बघेले, अखिलेश सेठ, नीरज उपवंशी, गंगाराम कापसे, विनय रामटेक्कर, अनिल मडावी, डोमेश्वर तुरकर, रमेश रहांगडाले, सुनील पटले, शैलेश वासनिक, अनिल मोहबे , हौसलाल रहांगडाले, जितेश बावणे, अल्पेश उके, कविसाव बिसेन, असंगर अली, सुरजलाल बिसेन, जासवंत अंबुले, सुनील मौदेकर, रमेश वाघाडे, कन्हय्या रहांगडाले, दुर्गा राऊत, शोभा राऊत, प्रेमीला राऊत, भुजा भुजाळे, रंजित बघेले, कार्तिक लिल्हारे, कार्तिक कटरे, वीरेश हरिणखेडे, कारण लिल्हारे, लेखन बिसेन, राज हरिणखेडे, जुगनू रंगारी, रविकांत नागपुरे, भाविक रंगारी, माया ठाकरे, हिमांशू राऊत, मनोज हेमने, योगेश डोये, रवी शेंदरे सहित मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.


