गोंदिया : आज राष्ट्रवादी काँग्रेस भवन रेलटोली, कार्यालय येथे गोंदिया शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला कार्यकारिणी व पक्ष संघटनेचा आढावा बैठक माजी आमदार राजेंद्र जैन, सौ. राजलक्ष्मी तुरकर, नानू मुदलियार, श्रीमती माधुरी नासरे यांच्या प्रमूख उपस्थितीत संपन्न झाली. गोंदिया शहरात महिलांचे संघटन वाढविण्याची गरज असून प्रत्येक वार्डात महिलांची बूथ कमेटी स्थापन करावी. आगामी विधान परिषद व नगर परिषदेच्या निवडणूक आहेत. नगर परिषदेच्या निवडणुकीत महिलांना ५० टक्के जागा राखीव असल्याने जास्तीत जास्त महिलांना प्रतिनिधित्व देता यावे यासाठी महिलांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडावे असे मार्गदर्शन माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी केले.
जैन पुढे म्हणाले की, महायुती सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी – लाडली बहन योजना, एस टी बस मध्ये ५० टक्के सवलत, मुलींना विद्यार्थीनिंच्या हिताचे निर्णय घेत अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषीविषयक सर्व व्यावसायिक पदवी-पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या मुलींना उच्च शिक्षणात मोफत शिक्षण करण्यात आलेले आहे. ८ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना याचा लाभ मिळणार. महिलांना ई पिंक रिक्षा, बचत गटातील महिलांना आर्थिक सहाय्य, इत्यादी जनहितोपयोगी योजनांचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा तसेच महिलांच्या व मुलींची प्रगती, आर्थिक स्वावलंबन व आत्मनिर्भर बनविण्यासाठी उचललेल्या पाहुलांचा व योजनांचा प्रचार प्रसार करावा असे मार्गदर्शन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.
यावेळी राजेंद्र जैन, राजलक्ष्मी तुरकर, नानू मुदलियार, माधुरी नासरे, प्रियाताई हरिणखेडे, सुशीला भालेराव, सविता मुदलियार, मालती कापसे, कुंदा पंचबुद्धे, शर्मिला पाल, सुचिता चौहान, नीता मूलचंदानी, कोमल अटलानी, मालती कापसे, कुंदा पंचबुधे, तृप्ति चौरागड़े, रुचिता चौहान, पुस्तकला माने, सरोज सिंगनधुपे, संगीता माटे, वर्षा तुरकर, राधिका कोल्हे, आराधना माटे, प्रगति दिप, ममता कुमार, पायल भेलावे, ज्योति भेलावे, अनिता मेश्राम, कविता सूर्यवंशी, सुनीता धपाड़े, आरती धपाडे, मनीषा बोरकर, मनीषा चुटे, लता राहंगडाले, पायल बग्गा, पल्लवी नेवारे, अनिता चौरावार, मोनिका सोनवाने, माया राघोते, माया अग्रवाल, भारती मेश्राम, वैशाली नागदेवे, सुदर्शना वर्मा, हेमलता भालाधरे, संध्या गोंडाने, सुनीता ब्रम्हपूरे सहीत महिला पदाधिकारी उपस्थित होते.

