भंडारा /प्रतिनिधी
लाडकी बहिण योजनेच्या नावाने भंडारा जिल्यात जिथे तिथे दलालांची लुटमार सुरु आहे मोबाईल अॅप च्या माध्यमातून चक्क दलाल मंडळी व महा-ई-सेवा केंन्द्रे तसेच शासनांच्या विविध केंद्रांवर दलालांची सक्रियता वाढलेली आहे या योजनेच्या नावाने अल्प शिक्षित व ग्रामीण माहिलांची दिशाभूल करून दलाल मंडळी त्यांच्या कडून अतिरिक्त आर्थिक लुबाडणूक करीत आहेत. शासनांने या योजनेतील सुरवाती काळातील अटी-शर्ती वगळून यात आता कोणतीही अट नाही असे स्पष्टपने सांगितलेले आहे, तरी सुद्धा हे भामटे काही अल्प शिक्षित व ग्रामीण महिला भगिनीची दिशाभूल करून अनेक विना आवश्यक कागदपत्राची पूर्तता करण्यास सांगतात आणि या कागदपत्रांची योग्य माहिती नसल्यामुळे ते या भामट्यांच्या जाळ्यात अळकतात .
भंडारा जिल्हातील शहरी व ग्रामीण भागात एक अर्ज भरण्याकरिता महा-ई-सेवा केंद्रामध्ये १०० ते २००० रुपये पर्यंत पैसे घेण्यात येत आहेत अशी तक्रार लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्था जिल्हा प्रमुख डॉ.हेमंत राहांगडाले यांच्या कडे आली आहे .
डॉ.हेमंत राहांगडाले यांनी याबद्दल वरिष्ठ विभागीय अधिकारी व प्रशासनाला कळवलेल आहे तसेच या संदर्भात सर्व जिल्हातील महिला वर्गांना हि महत्वाची सूचना देण्यात येत आहे, कि महाराष्ट्र शासनांने या योजनेची अर्ज प्रकिया सामान्य महिलावर्गाकरीता सरळ व सोपी केलेली आहे यात १ रुपये खर्च न करता आपल्या घरीच आपण हे अर्ज आँनलाईन पद्धतीने मराठी भाषेत भरू सकतो म्हणून कोणत्याही महा-ई-सेवा केंद्रावर अर्ज भरल्यास किवां अंगणवाडी ला अर्ज भरल्यास १ रुपये देऊ नये कारण या योजनांचे १ अर्ज आनलाईन भरण्याकरिता महाराष्ट्र शासनाकडून महा-ई-सेवा केंद्र आणि अंगणवाडी सेविकेला ५० रुपये देण्यात येत आहे ज्यामुळे अर्जदारास १ रुपये सुद्धा देण्याची आवश्यकता नाही आणि जर आपल्याला कोणीही महा-ई-सेवा केंद्रावर किवां अंगणवाडी तसेच व्ययक्तिक भामटा पैस्याची मागणी करीत असेल तर जिल्हातील माता-भगिनींनी लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्था जिल्हा प्रमुख डॉ.हेमंत राहांगडाले यांच्या जिल्हा कार्यालयाशी त्वरित ७७९८००७३५८ या क्रमांकावर संपर्क साधावे .

