खैरी पन्नासे येथील प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

0
166

सकाळ प्रहरी सुर्वे नगर गार्डन क्लबचा स्तुत्य उपक्रम

 

नागपूर : हिंगणा पंचायत समिती अंतर्गत येणा-या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खैरी पन्नासे येथे सकाळ प्रहरी सुर्वे नगर गार्डन क्लब नागपूरच्या वतीने रविवारी (ता.१३) शालेयोपयोगी साहित्य वितरण व वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शेखर पिसे होते.प्रमुख पाहुणे म्हणून केंद्र प्रमुख ज्ञानेश्वर आपतुरकर,मायनिंग मॅनेजर देवेंद्र रंगारी, सिनिअर मॅनेजर विजय ओरके ,असिस्टंट कमिशनर मदन मोटघरे, असिस्टंट कमांडर चंदूलाल पाटील,क्वालिटी मॅनेजर जगदीश शंभरकर, प्रा.पद्माकर डोंगरे, प्राचार्य धर्मरक्षित टेंभुर्णे,सहाय्यक शिक्षक विठ्ठल कांबळे, सहाय्यक शिक्षक महेंद्र सुदामे, तांत्रिक अशोक डहाट,शाळेचे मुख्याध्यापक धर्मेंद्र बुधे, सहाय्यक शिक्षक जाॅनी कऱ्हाडे उपस्थित होते.याप्रसंगी सरपंच शेखर पिसे यांनी,विद्यार्थ्यांच्या व शाळेच्या विकासासाठी सरपंच पदावर निवड झाल्यापासून आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या व यापुढे सुद्धा शाळेच्या विकासासाठी मदत करण्याची ग्वाही दिली.प्राचार्य धर्मरक्षित टेंभुर्णे यांनी, आई ,वडील, शिक्षक व पुस्तक हे विद्यार्थ्यांचे खरे गुरू व मित्र असून प्रत्येक व्यक्तीच्या सर्वांगिण विकासात यांचा मोलाचा वाटा असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श बाळगावा,असे आवाहन यावेळी त्यांनी केले.प्रा.पद्माकर डोंगरे, यांनी, सकाळ प्रहरी पदभ्रमंतीतून आरोग्य संवर्धन करणे,आरोग्यासह मनोरंजनात्मक आनंददायी वातावरण निर्मिती करणे,वैचारिक प्रबोधनातून सामाजिक जाणीव निर्माण करणे,गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मदत करणे,मैत्रीभाव व सहकार्याची भावना निर्माण करणे अशा अनेक उद्देशातून या क्लबची निर्मित करण्यात आली असून त्या दृष्टीकोनातून क्लबची वाटचाल सुरू आहे.याच उद्देशातून या शाळेत आम्ही आजचा उपक्रम राबवित असल्याचे सांगितले. तसेच आनंददायी पद्धतीने विद्यार्थ्यांना यशस्वी जीवनाचा मंत्र सांगून शिवाजी महाराज, माता जिजाऊ ,डाॅ.अब्दुल कलाम यांची यशोगाथा सांगून ‘आपण त्यांच्या समान व्हावे ‘ असा महामंत्र विद्यार्थ्यांना दिला. इंजी. विजय ओरके यांनी, आपल्या प्राथमिक शालेय जीवनातील अनुभवांना उजाळा दिला.असिस्टंट कमांडर चंदूलाल पाटील यांनी ,अभ्यासाच्या कठोर साधनेतून विद्यार्थ्यांना अधिकारी बनण्याचे आवाहन केले.तर मुख्याध्यापक धर्मेंद्र बुधे यांनी, शाळेअंतर्गत राबविण्यात येणा-या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली.
        याप्रसंगी क्लबच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या वर्ग एक ते चौथीच्या ४८ विद्यार्थ्यांना प्रत्येकी चार नोटबुक ,कंपास, एक स्केल, दोन पेन व पेन्सिल संच असे शालेय उपयोगी शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते शालेय परिसरात आंबा,लिंबू ,पेरू,डाळिंब, पिंपळ,अशोक, जांभूळ,बदाम,विद्या ,विविधरंगी फुलझाडे आदी विविध जातींची सुमारे ३५ रोपटे लावून वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक शिक्षक जाॅनी कऱ्हाडे यांनी केले व मान्यवरांचे आभार मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेच्या शिक्षकांनी सहकार्य केले.

Previous article‘लाडकी बहिन’ योजनेच्या नावाने लुटमार – डॉ.हेमंत राहांगडाले 
Next articleराष्ट्रवादी काँग्रेस पांजरा जिल्हा परिषद क्षेत्राची बैठक संपन्न