राष्ट्रवादी काँग्रेस पांजरा जिल्हा परिषद क्षेत्राची बैठक संपन्न

0
161

गोंदियाआज गोंदिया तालुक्यातील पांजरा जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कमेटी सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ताची बैठक श्री शिशुपाल उपवंशी, यांचे निवास स्थान मोगर्रा येथे माजी आमदार श्री राजेंद्र जैन, श्री कुंदनभाऊ कटारे, श्री गणेश बरडे, श्री केतन तुरकर, श्री रवी पटले, श्री अखिलेश सेठ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी परिसरातील समस्यांवर कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून बूथ कमेटीचा आढावा घेण्यात आला. जिल्हा परिषद क्षेत्रातील प्रत्येक बूथवर क्रियाशील लोकांची कमेटी बनविणे कमिटीमध्ये महिला, युवक व सर्व घटकांच्या नवीन लोकांना जोडण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे असे मार्गदर्शन माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी केले.

महायुतीच्या सरकारने कल्याणकारी योजना राबविलेल्या आहेत. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यात किसान सन्मान योजना, शेतकऱ्यांना वीज माफ लागू करण्यात आली. मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजना, मुलींना उच्च शिक्षणात मोफत शिक्षण, आवास योजना, यासारख्या योजनांच्या माध्यमातून महिलांचे, शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य लोकांचे राहणीमान बदलणार आहे. खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या नेतृत्वात आपल्या क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या धानाला बोनस, सिंचनाच्या सोयी, गोंदिया येथे मेडिकल कॉलेज, रेल्वेचा विस्तार व आधुनिकीकरण, बिरसी येथून विमान सेवा यासह क्षेत्राच्या विकासासाठी विविध विकास कामांना निधी उपलब्ध करून देणे. अनेक जन हिताची कामे जनतेपर्यंत पोचविण्याचे काम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करावे असे कार्यकत्यांना संबोधतांना श्री राजेंद्र जैन बोलत होते.

सर्वश्री राजेंद्र जैन, कुंदनभाऊ कटारे, गणेश बर्डे, केतन तूरकर, अखिलेश सेठ, रवी पटले, शैलेश वासनिक, संजय लिल्हारे, गंगाराम कापसे, मुन्ना नागपुरे, कनिसर नागपुरे, अशोक उपवंशी, रामचंद्र भगत, यशवंत तिघारे, कैलास बिरणवार, तुळशीराम उपवंशी, मूलचंद राऊत, करण सिंह सुलाखे, कीर्ती चौधरी, बारकू हनवते, धनीराम बघेले, किशोर बिरनवार, शिवराम सिंह, मेहतर भल्ले, गोपीचंद रंधाये, शिवप्रसाद रंधाये, रामचंद्र राऊत, दिलीप उपवंशी, बिजेश मेश्राम, मुकलाल पारधी, गणूलाल बिसेन, दिलीप कटारे, हेमराज बावणे, प्रेमलाल दुधबुरे, सखाराम रंधाये, सुभाष नागपुरे, रमेश रंधाये, छोटेलाल रंधाये, राजेश हरिणखेडे, जितेंद्र नागपुरे, आनंद केवट, अनमोल ढेकवार, राहुल उपवंशी, शिशुपाल उपवंशी, ब्रिजलाल टेभरे, राधेश्याम पटले, मोनु उपवंशी सहित मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.