…अखेर “त्या” शिक्षकांची मान्यता रद्द

0
4775

गोंदिया : गोंदिया जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग मधील तत्कालीन प्रभारी शिक्षणाधिकारी सुनील मांढरे यांनी कोरोना कालावधीमध्ये जिल्ह्यात नियमबाह्य व बेकायदेशीर शिक्षक मान्यता 2017 पासून 2020 मध्ये दिल्या होत्या.                                               सदर मान्यता ह्या नियमबाह्य बेकादेशीर असल्यामुळे शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग नागपूर यांनी नियुक्तीस मान्यता रद्द केल्या. त्यामुळे व्यथित होऊन नुकतीच मान्यता रद्द झालेल्या कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर येथे याचिका दाखल केल्या. शिक्षण-उपसंचालक नागपूर विभाग नागपूर यांनी मान्यता रद्द करतानी संबंधित कर्मचाऱ्यांना सखोल कारणे दाखवा नोटीस न दिल्यामुळे मान्यता रद्द करण्याचे शिक्षण उपसंचालकाचे आदेश रद्द करून एक महिन्याचे आत सहसंचालक शिक्षण विभाग पुणे यांनी सुनावणी घ्यावी असे आदेश पारित केले. एक महिन्याच्या  आत सुनावणी घेतली नाही तर संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित सुरू करावे असे देखील आदेश दिले. परंतु सहसंचालक शिक्षण पुणे यांनी दिलेल्या मुदतीच्या आत सुनावणी न घेतल्यामुळे संबंधित कर्मचारी यांना वेतन देण्याचे आदेश देण्यात आले. परंतु नुकतेच 01 जुलै 2024 ला सहसंचालक शिक्षण पुणे यांनी शिक्षण उपसंचालक, नागपूर विभाग नागपूर यांचे आदेश कायम करून सर्वच्या सर्व सोळा शिक्षकांच्या मान्यता रद्द केले आहेत.
        मान्यता रद्द झालेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांची नावे विनोद हेमराज जगणे,स.शि., जी.एम. हरीणखेडें स.शि., (सेजगाव हायस्कूल, सेजगाव, ता. तिरोडा) कु.एम.पी. समरीत स.शि.एस. पी.डोंगरे स.शि.(गणेश हायस्कूल गुमाधावडा,ता तिरोडा) निशा विजयसिंग नागपूरे, स.शि (एसएसपीडी हायस्कूल म्हसगाव, ता.गोरेगांव) कु.दिपिका गुलाब दमाहे,स.शि.(स्वामी विवेकानंद हायस्कूल सोनपूरी,ता. सालेकसा) कमलेश शालीकराम ठाकुर स.शि., संजय ग्यानीराम बिरनवार,स.शि.(हरीदास भवरजार हाय.गणखेरा ता. गोरेगांव), महेश शिवसागर बड़ोले स.शि.,ममता जगतलाल अम्बुले स. शि.(फुलीचंद भगत हायस्कूल कोसमतोड़ी ता. सड़क/अर्जुनी)
अनिताबाई प्रेमलाल मेंढे,स.शि. हिमाशी युगल मोहन,स.शि.(परशुराम विद्यालय मोहगाव ता. गोरेगांव) शालुताई धनराज कोटांगले स.शि., प्रियंका मुखरु शामकुळे, स.शि. अमृताबेन पटेल हायस्कूल रिसामा ता-आमगाव),कु. स्मिता प्रमोदकुमार कटरे स.शि.(डॉ. आंबेडकर माध्य, विद्यालय सरकारटोला ता- आमगाव) एने प्रमाणे आहेत.

Previous articleकाँग्रेसचे मास्टर स्ट्रोक – राजकुमार (पप्पूभाऊ) पटले विधानसभेचे उत्तम उमेदवार ठरू शकतात
Next article१८ ऑगस्ट रोजी आलापल्लीत भव्य रोजगार मेळावा.