राजीव गांधी हायस्कूल येथे सायकल वितरण

0
144

एटापल्ली :- वन वैभव शिक्षण मंडळ द्वारा संचालित स्थानिक राजीव गांधी हायस्कूल एटापल्ली येथे सावित्रीमाईंच्या 24 लेकिंना मानव मिशन योजने अंतर्गत शिक्षण विभाग गडचिरोली यांच्या मार्फत सोमवार दिनांक 15 जुलै ला सायकल वाटप करण्यात आले.   तालुक्यातील खेडे गावात शिक्षणाची सोय नसल्यामुळे बाहेर गावावरून ये – जा विद्यार्थिनींना शाळेत वेळेत पोहोचणे सोईस्कर व्हावे. गळतीचे प्रमाण कमी व्हावे, मुली शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने बाहेर गावावरून येणाऱ्या सावित्रीमाईंच्या 24 लेकिंना नगर सेवक जितेंद्र टिकले, मुख्याध्यापिका शेख मॅडम, ज्येष्ठ शिक्षक श्रीकांत कोकुलवार, गट साधन केंद्र एटापल्ली चे विषय तज्ञ किशोर खोब्रागडे, सुरज उत्तरवार यांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आले. यावेळी पत्रकार शैलेश आकुलवार, श्रीकांत तेलकुंटलवार पालक वर्गातून मानवेल केरकट्टा, नंदू कलमोटी, सुरेश पुंगाटी, सत्तू रापंजी, शाळेतील शिक्षक शेख, बारई, गुंडावार, गोपाला चनकापूरे, कु. दर्रो, बारई, पठाण, तलांडी, गोरे, अर्का उपस्थित होते.  दरम्यान विद्यार्थींना शाळेत नियमित उपस्थित राहून शाळा गुणवत्तेसाठी प्रयत्न करावा. स्वतःचे भविष्य उज्वल करावे असे उपस्थित मान्यवरांनी यावेळी सांगितले. यशस्वितेसाठी शाळेतील सर्व कर्मचारी सहकार्य केले.

Previous articleखासदार डॉ. किरसान यांचा 17 जुलै रोजी सालेकसा दौरा
Next articleमोहर्रम के उपलक्ष मे किया शरबत वितरण