पंकज रहांगडाले / न्युज प्रभात विशेष प्रतिनिधी
गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव या विधानसभा क्षेत्रात काँग्रेस कडून हरीश कुमार बन्सोड यांच्या नावाची चर्चा जोराने सुरू आहे..
लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा उत्साह वाढला आहे, तर महायुती बॅकफुटवर गेली आहे. महाविकास आघाडीने ४८ पैकी ३० जागा जिंकल्या आहेत. याशिवाय महाविकास आघाडीला विधानसभेच्या सुमारे १५५ मतदारसंघांमध्ये आघाडी मिळाली आहे. काँग्रेस हा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरल्याने जास्तीत जास्त जागांच्या मागणीसाठी या पक्षाच्या नेत्यांनी हट्ट धरणे स्वाभाविक आहे. आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत यशाचे सूत्र कायम राहण्यासाठी आता महाविकास आघाडी कामाला लागली आहे.
महाराष्ट्राच्या पूर्व टोकावर असलेल्या गोंदिया जिल्ह्यात एकूण ०४ विधानसभा मतदारसंघ असून मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्राकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. अनेक वर्षांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढत असल्याने या मतदारसंघात काँग्रेसला संधी मिळाले नाही. मात्र, राष्ट्रवादी मध्ये उभी फुट पडल्यानंतर या मतदारसंघांमध्ये आता काँग्रेसचे वर्चस्व बघायला मिळत आहे. अशातच आता आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी अनेक नावं समोर येऊ लागली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने हरीश कुमार बन्सोड यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. हरीशकुमार बन्सोड गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाचे काम करत असून ते पक्षाशी एकनिष्ठ राहिले आहेत. शिवाय त्यांच्या वडिलांनी देखील काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी या विधानसभा क्षेत्रात काम केला आहे. हरीशकुमार बन्सोड यांचा दांडगा जनसंपर्क असून ते नेहमी जनसामान्य नागरिकाच्या समस्यांना सोडविण्यासाठी तत्पर असतात तर ग्रामीण भागातही आगामी विधानसभा निवडणुकीत ते आमदार व्हावेत काँगेसने त्यांना उमेदवारी द्यावी अशी चर्चा जोर धरु लागली आहे..